आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्षांची झाली मंदिरा बेदी, पाहा तिच्या खासगी आयुष्यातील 42 PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री, मॉडेल, फॅशन डिझायनर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखली जाणारी मंदिरा बेदी आज (15 एप्रिल) आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहे. मंदिराला नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या शांती या मालिकेसाठी ओळखले जाते. या मालिकमुळे मंदिरा घराघरात शांती या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यानंतर ती औरत, क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकांमध्ये दिसली.
आयपीएलचे केले कव्हरेज-
शांती या मालिकेत नॉन ग्लॅमरस रुपात झळकलेली मंदिरा आज आपल्या स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. 2003मध्ये मंदिराने आयपीएलच्या तिस-या पर्वाच्या सूत्रसंचालकाची धुरा सांभाळली होती. याकाळात तिने परिधान केलेल्या साड्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या. गेल्याचवर्षी मंदिराने स्वतःचे साडी स्टोर लाँच केले.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी थाटले लग्न -
मंदिराने राज कौशल यांच्यासोबत 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केले. या दोघांना एक मुलगा असून 19 जून 2011 रोजी त्याचा जन्म झाला. मंदिराने आपल्या मुलाचे नाव वीर ठेवले आहे.
मंदिरा बेदीला तुम्ही आजवर टीव्हीवर अभिनय आणि होस्टिंग करताना पाहिले आहे. मात्र आज तिच्या 42 वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला तिच्या खासगी आयुष्याची खास झलक 42 छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मंदिराची खास छायाचित्रे...