मुंबईः
अमिताभ बच्चन आणि
शाहरुख खान या दोन मोठ्या स्टार्सची भेट अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या सेटवर झाली. निमित्त होते, आगामी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाच्या प्रमोशनचे.
आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख आपल्या टीमसोबत '
केबीसी'च्या सेटवर पोहोचला होता.
प्रमोशनवेळी दिग्दर्शिका फराह खान आणि शाहरुखसह दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी,
सोनू सूद आणि विवान शाह यांचीही येथे उपस्थिती होती. यावेळी सर्व स्टार्सनी 'केबीसी'च्या सेटवर
बिग बींसह भरपूर धमाल-मस्ती केली. अभिषेकने आपल्या वडिलांसह मंचावर भरपूर डान्ससुद्धा केला. अमिताभ यांनी याविषयी आपल्या
फेसबुक अकाउंटवर लिहिले, "आज कुछ अजब ही रहा समा... हॅपी न्यू ईयर फिल्म के कलाकार सब के सब KBC के सेट पर... और फिर जब सब के सब आ ही गए तो नाच गाना.. धूम मच गई..."
बिग बींनी आपल्या
ट्विटर अकाउंटवरसुद्धा काही छायाचित्रे शेअर करुन ट्विट केले, "#HNY team on sets of KBC!! Waiting for this episode now...''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'केबीसी'च्या सेटवर पोहोचलेल्या 'हॅपी न्यू इयर'च्या टीमची खास छायाचित्रे...