आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गालिब फैज, अहमद फैजशिवाय पाकिस्तानी मालिका अधु-याच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: ‘पाकिस्तानी मालिकांना उर्दू साहित्याची फार समृद्ध अशी पार्श्वभूमी लाभली आहे. या मालिका आज कितीही आधुनिक असल्या तरी त्या मिर्झा गालिब आणि फैज अहमद फैज यांच्याविना अधुऱ्याच आहेत. खरेतर त्यांचा प्रभाव नसलेली आजपर्यंत एकही पाकिस्तानी मालिका झालेली नाही.’असे सांगत प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका दिग्दर्शक हसीम हुसैन यांनी थेट पाकिस्तानातून दूरध्वनीद्वारा ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.
‘जिंदगी’ या चॅनेलवर सध्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ या भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित मालिकेच्या निमित्ताने ते बोलत होते. ‘दास्ताँ’ या नावाने ही मालिका २०१० साली पाकिस्तानमध्ये हम टीव्ही या चॅनेलवर प्रसारित झाली होती. मात्र भारतात ‘जिंदगी’ चॅनल सुरू झाल्यानंतर या मालिकेकडे बघण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन कळण्यास मदत झाली असेही यावेळी हुसैन यांनी सांगितले. सोशल मीडियावर या मालिकेस पाकिस्तानी प्रेक्षकांपेक्षाही अधिक भारतीय प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी हुसैन यांनी नमूद केले. मालिकेतील कलाकार ‘खुबसुरत’चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा फवाद खान याच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला भारतीयांकडून उत्तम दाद मिळत असल्याचे सांगत हुसैन यांनी फाळणीच्या जखमाच केवळ या मालिकेतून न उसवता फाळणीनंतर आज नेमके हे दोन्ही देश कुठे उभे आहेत आणि खरोखर परिस्थिती सहिष्णू झाली आहे का यावरही प्रेक्षकाला विचार करायला ही मालिका प्रवृत्त करते असेही स्पष्ट केले.
सांस्कृतिक आदान-प्रदानच कलाकाराला तारेल अन‌् देशांना सांधेल राजकीय अराजकाचा वा उध्वस्ततेचा परिणाम त्या त्या देशातील कलेवर होत असतो. कलेचे, संस्कृतीचे आदान-प्रदान थांबले तर ती संस्कृती, कला लयाला गेल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे ही मालिका जरी फाळणीवर असली तरी पाकिस्तानी विचार व भारतीय विचार दोन्ही संतुलितरीत्या दाखवून त्यातील मानवतावादी घटक केवळ उद्धृत करणे हा मालिकेचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे सांस्कृतिक आदान-प्रदान उभय देशांत झाल्यास ते कलाकाराला तारेल शिवाय दोन्ही देशांना सांधूही शकेल. तसे जर झाले तर कलाक्षेत्राचे फार मोठे यश असेल असा आशावादही हसीम हुसैन यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा काय आहे या मालिकेचे कथानक...