आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hema Malini And Others Celebs At Nikitin Dheer And Kritika Sengar Wedding Reception Bollywood.Bhaskar.Com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pix: \'थंगाबली\' आणि \'राणी लक्ष्मीबाई\'च्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हेमासह अनेक टीव्ही स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नादरम्यान निकितन धीर आणि कृतिका सेंगर)
मुंबई: 'चेन्नई एक्स्प्रेस' या बॉलिवूड सिनेमातील थंगाबलीची भूमिका साकारलेला निकितन धीर आणि कृतिका सेंगर ('झासी की रानी' या टीव्ही मालिकेतील लक्ष्मीबाई) दोघे बुधवारी (3 सप्टेंबर) लग्नगाठीत अडकले आहेत. आयटीसी ग्रँड मराठा, मुंबईमध्ये त्यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दोघांचे कुटुंबीय सामील होते. बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स सामील झाले होते.
या स्टार्समध्ये हेमा मालिनी, पुनीत इस्सर आणि त्याची पत्नी, गौहर खान आणि तिचा कथित बॉयफ्रेंड कुशाल टंडन, विवियन दसेना आणि त्याची पत्नी वाहबिज दोराबजी, अनंग देसाई आणि त्याची पत्नी गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी, रोहित रॉय आणि त्याची पत्नी, अर्जुन त्याची पत्नी मुलगा, रजा मुराद आणि त्याची पत्नी, स्मिता बंसल आणि तिचा पती, रणवीर शौरीआणि त्याची पत्नी कोंकणा सेन शर्मा, डॉली बिंद्रा, पूजा गौरी आणि राज सिंह अरोरा, मृणाल कुलकर्णी, गजेंद्र चौहाण आणि त्याची पत्नी करणवीर बोहरा आणि मोहित रैनासह अनेकांनी हजेरी लावली.
कोण आहे निकितन?
निकितन धीर एक बॉलिवूड अभिनेता आहे. त्याने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमात थंगाबलीचे पात्र साकारले होते. शिवाय, त्याने 'खतरों के खिलाडी' या टीव्ही शोच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. 'जोधा अकबर' (2008), 'मिशन इस्तांबुल' (2008), 'रेडी' (2011), आणि 'दबंग 2' (2012) सारख्या बॉलिवूड सिनेमांतसुध्दा त्याने अभिनय केला आहे. निकितन टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द चेहरा पंकज धीर यांचा मुलगा आहे. 1994-1996मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणा-या 'चंद्रकांता' या मालिकेत शिवदत्तच्या रुपात लोकप्रिय झाले होते.

कोण आहे कृतिका?
कृतिका एक टीव्ही अभिनेत्री असून तिने 2010-2011मध्ये झीटीव्हीवर प्रसारित होणा-या 'झांसी की राणी' मालिकेत लक्ष्मीबाईचे पात्र साकारले होते. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. शिवाय, 'कसौटी जिंदगी की' (2007-2008) आणि 'पुनर्विवाह' (2012-2013) सारख्या मालिकेतसुध्दा तिने काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रेे...