आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते TV ची सीता, बी ग्रेड सिनेमांमध्ये दिले आहेत बोल्ड सीन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात मोठी मालिका अर्थातच 'रामायण' आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत सीतेची भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखालिया. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'रामायण' या मालिकेद्वारे दीपिका घराघरांत पोहोचली. सीतेच्या भूमिकेत तिला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. शिवाय तिला साक्षात देवी समजून लोक तिच्या पाया पडायचे. मालिकेद्वारे प्रसिद्धी मिळाल्यानंतर दीपिकाने मोठ्या पडद्यावरही अभिनय केला. मात्र आता तिने अभिनयाला रामराम ठोकला असून ती आपल्या खासगी आयुष्यात बिझी आहे. 29 एप्रिल 1965 रोजी जन्मलेल्या दीपिकाने 'रामायण' या मालिकेपूर्वी काही सिनेमांमध्ये अभिनय केला होता. यामध्ये बी ग्रेड सिनेमांचाही समावेश होता.
1987 मध्ये 'रामायण' ही मालिका दूरदर्शनवर सुरु झाली. ही त्याकाळातील भारतातील यशस्वी आणि पहिली पौराणिक मालिका होती. या मालिकेत दीपिका चिखालियाने सीतेची भूमिका साकारली होती. दीपिकाने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 1983 मध्ये 'सुन मेरी लैला' या सिनेमाद्वारे केली होती. या सिनेमात राज किरण दीपिकासह मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. मात्र 1987 नंतर दीपिकाला 'ए' ग्रेड सिनेमांत काम मिळाले नाही.
1983 से 1987 या काळात दीपिकाने काही टीव्ही मालिका आणि फ्लॉप सिनेमांत काम केले. 1985मध्ये 'दादा-दादी की कहानियां' या प्रसिद्ध मालिकेत काम केले. 'भगवान दादा' (1986) आणि 'काला धंधा गोरे लोग' (1986) या सिनेमात ती सहायक अभिनेत्री म्हणून झळकली. दीपिकाला ए ग्रेड सिनेमांत काम मिळणे बंद झाल्यानंतर तिने आपला मोर्चा बी ग्रेड सिनेमांकडे वळवला. 'चीख'(1986) आणि 'रात के अंधेरे में' (1987) या बी ग्रेड हॉरर सिनेमात ती मेन लीडमध्ये झळकली. मात्र हे सिनेमे फ्लॉप ठरले. त्यानंतर 1987मध्ये दीपिकाला रामानंद साखर यांच्या 'रामायण' या प्रसिद्ध मालिकेत सीतेची भूमिका मिळाली आणि ती एका रात्रीत स्टार बनली.
सीतेच्या भूमिकेनंतर दीपिकाचे इंडस्ट्रीतून अचानक गायब होणे सर्वांना अचंबित करणारे होते. दीपिका राजकारणातही सक्रिय होती, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. 90च्या दशकात ती भाजपची खासदार होती. दीपिकाचे लग्न हेमंत टोपीवाला यांच्याबरोबर झाले. तिला निधी आणि जुही या दोन मुली आहेत. मुली आणि पती यांच्याबरोबर ती आपल्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. तिचे पती हेमंत टोपीवाला यांचा मुंबईत टिप्स अँड टोज कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. दीपिका आता आपल्या नव-याच्या कंपनीत मार्केटिंग टीमची हेड आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ती ऑफिसमध्ये असते. दीपिकाचा अभिनय क्षेत्रात परतण्याचा कोणताही विचार नाहीये. खरं तर तिला ब-याच ऑफर्स आल्या. मात्र तिच्या मते, दोन मुलींमुळे दुपारी चारनंतर तिला घराबाहेर पडणं शक्य होत नाही.

'रामायण' या मालिकेचा शेवटचा भाग 31 जुलै 1988 रोजी प्रसारित झाला होता. त्यावेळी जणू एक युग संपले, असे सर्वांना वाटले होते. ‘भगवान दादा’ (1986), ‘रात के अंधेर में’ (1987), ‘खुदाई’ (1994), ‘सुन मेरी लैला’ (1985), ‘चीख’ (1986), 1989 मध्ये आलेला बंगाली सिनेमा ‘आशा ओ भालोबाशा’ आणि 1992 मध्ये आलेल्या ‘नांगल’ या तामिळ सिनेमात काम केले होते. बी ग्रेड सिनेमांमध्ये दीपिकाने अंगप्रदर्शनही केले होते. ‘घर का चिराग’ (1989) आणि ‘रुपए दस करोड़’ (1991) या सिनेमांत तिने छोटेखानी भूमिका साकारल्या होत्या. ‘घर का चिराग’ आणि खुदाई या सिनेमात तिने राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केले होते. दीपिकाचे जास्तीत जास्त सिनेमे फ्लॉप ठरले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, दीपिकाचे काही ओल्ड अँड न्यू PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...