आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षानंतर TV वर कमबॅक करतेय 'सीता', बघा एवढ्या वर्षांत किती बदलला LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1987 ते 1988 या काळात भारतीय टेलिव्हिजनवर गाजलेली सर्वात मोठी मालिका म्हणजे 'रामायण'. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत सीतेची भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखालिया. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'रामायण' या मालिकेद्वारे दीपिका घराघरांत पोहोचली. सीतेच्या भूमिकेत तिला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. आता तब्बल 25 वर्षांनंतर दीपिका टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. 'छुटा छेडा' या गुजराती मालिकेत दीपिका झळकणारेय. अलीकडेच dainikbhaskar.com ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत दीपिकाने ही गोष्ट शेअर केली.  (क्लिक करा आणि वाचा दीपिकाची एक्सक्लूझिव्ह मुलाखत)

'रामायण'पूर्वी केलं होतं बी ग्रेड सिनेमांत काम... 
दीपिकाने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 1983 मध्ये 'सुन मेरी लैला' या सिनेमाद्वारे केली होती. या सिनेमात राज किरण दीपिकासह मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. मात्र 1987 नंतर दीपिकाला 'ए' ग्रेड सिनेमांत काम मिळाले नाही. 1983 से 1987 या काळात दीपिकाने काही टीव्ही मालिका आणि फ्लॉप सिनेमांत काम केले. 1985मध्ये 'दादा-दादी की कहानियां' या प्रसिद्ध मालिकेत काम केले. 'भगवान दादा' (1986) आणि 'काला धंधा गोरे लोग' (1986) या सिनेमात ती सहायक अभिनेत्री म्हणून झळकली. दीपिकाला ए ग्रेड सिनेमांत काम मिळणे बंद झाल्यानंतर तिने आपला मोर्चा बी ग्रेड सिनेमांकडे वळवला. 'चीख'(1986) आणि 'रात के अंधेरे में' (1987) या बी ग्रेड हॉरर सिनेमात ती मेन लीडमध्ये झळकली. मात्र हे सिनेमे फ्लॉप ठरले. त्यानंतर 1987मध्ये दीपिकाला रामानंद साखर यांच्या 'रामायण' या प्रसिद्ध मालिकेत सीतेची भूमिका मिळाली आणि ती एका रात्रीत स्टार बनली.

आता कॉस्मेटिक कंपनीत मार्केटिंग हेड आहे दीपिका... 
सीतेच्या भूमिकेनंतर दीपिकाचे इंडस्ट्रीतून अचानक गायब होणे सर्वांना अचंबित करणारे होते. दीपिका राजकारणातही सक्रिय होती, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. 90च्या दशकात ती भाजपची खासदार होती. दीपिकाचे लग्न हेमंत टोपीवाला यांच्याबरोबर झाले. तिला निधी आणि जुही या दोन मुली आहेत. मुली आणि पती यांच्याबरोबर ती आपल्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. तिचे पती हेमंत टोपीवाला यांचा मुंबईत टिप्स अँड टोज कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. दीपिका आता आपल्या नव-याच्या कॉस्मेटिक कंपनीत मार्केटिंग टीमची हेड आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ती ऑफिसमध्ये असते. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, दीपिकाचे काही ओल्ड अँड न्यू PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...