आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षानंतर आता अशी दिसते TV ची 'अफसर बिटिया', जाणून घ्या आता कुठे आणि काय करते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2011 मध्ये आलेली 'अफसर बिटिया' ही मालिका त्याकाळातील गाजलेल्या मालिकांपैकी एक होती. एका गरीब तरुणीचा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेत चित्रीत करण्यात आला होता. मालिकेत मिताली नाग या अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. मिताली अभिनेत्रीसोबतच एक गायिका असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. अलीकडेच तिचा 'मेरे देश की धरती' या म्युझिक व्हिडिओ युट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. तिने 'उपकार' सिनेमातील गाणे रिक्रिएट केले आहे. यामधील दुसरे गाणेसुद्धा रिलीजसाठी तयार आहे.
अचानक मिळाली होती मालिका...
divyamarathi.com सोबत बोलताना मितालीने आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. मितालीने सांगितले, "अफसर बिटिया या मालिकेपूर्वी मी मुंबईत काही रिअॅलिटी शोज करत होती. अभिनेत्री होण्याची इच्छा होतीच. मात्र लूक्समुळे थोडा संभ्रम होता. सहसा मालिकांसाठी निर्माते दिग्दर्शक गोरी आणि उंच तरुणींची निवड करतात. मात्र मी अॅक्ट्रेस मटेरिअल नसल्याचे मला वाटायचे. एकेदिवशी मी माझे होमटाउन नागपूरला निघाले होते. वाटेत असताना मला माझ्या एका मित्राने अफसर बिटिया मालिकेविषयी सांगितले. मात्र प्रवासात असल्याने मी ऑडिशन देऊ शकत नव्हती. मी माझ्या बेसिक मेकअप आणि जुन्या कपड्यांमधील एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन पाठवला. सरप्राइजिंगली माझा व्हिडिओ वाहिनीला आवडला आणि अशापद्धतीने माझी निवड झाली. हा माझ्यासाठी एक मोठा ब्रेक होता."

आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे मिताली...
"मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझे आईवडील विभक्त झाले आहेत. आई (नलिनी नाग) नागपुरात म्युझिक अॅकॅडमी चालवतात. त्या संगीतकारसुद्धा आहेत. अफसर बिटिया या मालिकेसाठी निवड झाली तेव्हा मी 25 वर्षांची होती. या मालिकेनंतर लोक मला ओळखू लागले. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईला माझा अभिमान वाटतो. या मालिकेनंतर त्याच त्याच धाटणीच्या मालिकांची ऑफर मला येऊ लागली. मात्र टाइपकास्ट भूमिका करायची माझी इच्छा नाही."

सावळ्या रंगामुळे अनेकदा झाली होती रिजेक्ट
"सुरुवातीच्या काळात सावळ्या रंगामुळे मला अनेक नकार पचवावे लागले. इतकेच नाही तर आजही अनेकदा मला या गोष्टीला तोंड द्यावे लागते. टीव्ही इंडस्ट्रीत प्रोग्रेस करत आहे. मात्र अफसर बिटिया मालिकेच्या वेळी जी परिस्थिती होती ती अद्याप बदलेली नाही. तुम्ही कितीही टॅलेंटेड असला तरीसुद्धा काळा-गोरा हा भेद करुन टॅलेंटला कमी लेखले जाते."

"अफसर बिटिया या मालिकेसाठी मला डार्क मेकअप करावा लागला होता. मालिकेत मी जेवढी सावळी दिसली, प्रत्यक्षात मी तितकी नाहीये. मी थोडी सावळी आहे. भविष्यात आणखी किती काळ आम्हा कलाकारांना रंगभेदाचा सामना करावा लागेल, हे मला ठाऊक नाही. जेव्हा लोक रंगापेक्षा टॅलेंटला महत्त्व देतील, त्या दिवसाची मी वाट बघत आहे."

2013 मध्ये झाले लग्न
"मुंबईत दाखल झाल्यानंतर माझा पहिला जॉब हा BPO चा होता. त्याकाळात संकल्प परदेशी (नवरा)सोबत माझी भेट झाली होती. मात्र आमच्यात फारसे बोलणे होत नसे. मग मी अभिनयासाठी ती नोकरी सोडली. अफसर बिटिया या मालिकेच्या काळात एका मित्राने पुन्हा संकल्पसोबत माझी भेट घालून दिली. आम्ही BBM पिन शेअर करुन चॅटिंग करायला लागलो. ही 2013 ची गोष्ट आहे. मी संकल्पला समजून घेण्यासाठी थोडा वेळ घेतला. या भेटीनंतर दीड वर्षांनी आम्ही लग्न केले." मितालीच्या नव-याची मुंबईत स्वतःची इंटेरिअर डिझायनिंग कंपनी आहे.

नागपूरमध्ये झाले शिक्षण, 2007 मध्ये गाठली मुंबई...
मितालीने नागपूरमधून शिक्षण घेतले. नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमधून तिचे शालेय आणि नंतर हिस्लॉप कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. 2007 मध्ये ती मुंबईत दाखल झाली. अफसर बिटियानंतर मितालीला सिंगिंमध्ये आपले करिअर करायचे होते. मात्र हेक्टिक शेड्युलमुळे ती फार काळ गाणे सुरु ठेऊ शकली नाही. टीव्हीवर द्रौपदीच्या भूमिकेत मिताली झळकली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मितालीचे बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे खास PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...