मुंबई-
बिग बॉसमध्ये स्पर्धकांवर रागावलेला सलमान तुम्ही पाहिला असेल. मात्र सलमानच्या रागाचा फटका आता खुद बिग बॉसच्या निर्मात्याला बसला आहे. त्याचे झाले असे की, सलमानने स्पर्धकांसाठी आपल्या घरचे जेवण पाठविले होते. आठवडयाच्या शेवटी शुटिंग दरम्यान सलमानने जेव्हा स्पर्धकांना विचारले की, त्यांना जेवण कसे वाटले? तेव्हा सर्वांना सलमान नेमक कशाबद्दल विचारत आहे, हेच कळाले नाहि. सर्व एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. कुणीही सलमानला उत्तर दिेले नाही.
तेव्हा सलमानला कळून चुकले की, निर्मात्याने त्याचे जेवणच स्पर्धकांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यावर भडकलेल्या सलमानने सर्वांदेखत निर्मात्याची खरडपट्टी काढली.
सलमानने यावेळेस म्हटले की, 'बिग बॉसच्या निर्मात्याने एक तर माझे जेवण स्पर्धकांकडे पाहोचविले नाही. दुसरे त्यांनी याबद्दल मला सांगण्याचीही तसदी घेतली नाही. सलमानने म्हटले की, त्यांनी माझा अपमान केला आहे. हे मला बिल्कुल आवडलेले नाही.'
'बिग बॉस 10' मध्ये याआधीही खूपदा चिडला आहे सलमान
सलमानने आतापर्यंत बिग बॉसच्या 6 सिझनचे सूत्रसंचालन केले आहे. सलग सातव्या वेळेस तो बिग बॉसचे सुत्रसंचालन करीत आहे. प्रत्येक सिझनमध्ये सलमान स्पर्धकांवर चिडला आहे आणि कित्येकदा त्याने प्रेमाने समजावूनही सांगितले आहे.
मात्र 10व्या सिझनमध्ये सलमान जास्त वेळेस चिडतानाच दिसत आहे. कित्येकवेळी तर तो रागाने शूटिंगही सोडून गेला आहे. विशेषकरुन स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा या दोन स्पर्धकांवर तो जास्त रागावताना दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर पहा, 10 व्या सिझनमधील असे क्षण जेव्हा सलमानला राग अनावर झाला.