आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here’s How Ali Asgar Turns Into 'Nani' On The Sets Of ‘The Kapil Sharma Show’

8 PHOTOS पाहा मेकअपनंतर अली असगर कसा बनला कपिलची 'नानी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये 'दादी' (वडिलांची आई) च्या भूमिकेत प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अली असगर आता 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'नानी' (आईची आई) च्या भूमिकेत झळकणारेय. ही नानी हाफ ब्लाइंड लेडी असून कप्पू अर्थातच कपिल शर्माची आजी आहे. पुन्हा एकदा स्त्री पात्र साकारणे नक्कीच अलीसाठी सोपे नाहीये. कारण मागील शोमधील इमेज रिपीट होऊ नये आणि प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे, अशी दुहेरी जबाबदारी अलीवर आहे. त्यामुळे हा नवीन लूक घेण्यासाठी मेकअपची मदत घेण्यात आली आहे.

प्रेक्षकांच्या मागणीवरुन पुन्हा स्त्री रुपात झळकणार अली...
divyamarathi.com सोबत बातचित करताना अलीने सांगितले, की पुन्हा स्त्री पात्र साकारणे ही अलीची नव्हे तर प्रेक्षकांची मागणी होती. शोच्या टीमने ही मागणी पूर्ण केली आहे. हे पात्र योग्यरित्या साकारण्यासाठी आपल्याला लेखक आणि दिग्दर्शकाने मदत केली असल्याचे, अली म्हणाला.

'नानी' बनण्यासाठी लागतो अर्धा तास...
शोच्या सेटवर 'नानी' बनण्यासाठी अलीला ३० ते ३५ मिनिटे लागतात. मेकअपसाठी केवळ १५ मिनिटे लागतात. मात्र हेअर स्टाइलसाठी अधिक वेळ द्यावा लागतो. अलीला आता या सगळ्या प्रक्रियेची सवय झाली आहे. अलीने नवीन भूमिकेसाठी बरेची मेहनत घेतली आहे, आता प्रेक्षकांची त्याला कशी प्रतिक्रिया मिळते, याकडे त्याचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मेकअपनंतर कसा अली बनला 'नानी'...