आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका एपिसोडसाठी 1.25 लाख रुपये घेतो राम कपूर, जाणून घ्या TV स्टार्सच्या फीसचा आकडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - राम कपूर)
मुंबई - टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता राम कपूरने सोमवारी आपला 41वा वाढदिवस साजरा केला. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक महागडा अभिनेता म्हणून राम कपूरला ओळखले जाते. अलीकडेच त्याची गाजलेली 'बडे अच्छे लगते है' ही मालिका ऑफ एअर झाली. तेव्हापासून त्याचे छोट्या पडद्यावर दर्शन घडलेले नाहीये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम कपूर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेसाठी तब्बल सव्वा लाख रुपये प्रति दिवसाचे मानधन घेत होते. एखाद्या टीव्ही अभिनेत्याला मिळणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे.
राम कपूरने 1997 मध्ये न्याय या मालिकेद्वारे अभिनय करिअरला सुरुवात केली. 'हिना' (1998), 'संघर्ष' (1999) आणि 'कविता' (2000) या मालिकांमध्ये त्याने अभिनय केला. त्याला पहिले मोठे यश हे 2000 मध्ये 'घर एक मंदिर' या मालिकेद्वारे मिळाले.
2006 में रामने एकता कपूरच्या ‘कसम से, 2007मध्ये ‘सास भी कभी बहू थी’ आणि 2011मध्ये ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकांमध्ये काम केले. ‘बडे अच्छे लगते हैं’ ही रामची आत्तापर्यंतची शेवटची मालिका आहे.
प्रति दिवसाच्या रुपात मानधन घेणारा राम टीव्ही इंडस्ट्रीतील एकमेव अभिनेता नाहीये. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही स्टार्सना डेली बेसिसवर मानधन दिले जाते. स्वतःची इंडस्ट्रीतली 'किंमत' ओळखून टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सनी आपल्या मानधनात चांगलीच वाढ केलीय.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कोणता टीव्ही स्टार किती रुपये मानधन घेतो हे सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या टीव्ही स्टार्सची इनकम...