आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himanshu Soni Aka Shivay Of Neeli Chatri Wale Ties Knot With Sheetal Singh

TV इंडस्ट्रीचा हा प्रसिद्ध अॅक्टर चढला बोहल्यावर, जयपूरमध्ये शाही थाटात अडकला लग्नाच्या बेडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही इंडस्ट्रीत सध्या सनई चौघड्यांचे सूर घूम लागले आहेत. अलीकडेच अभिनेत्री दिशा वाकाणी आणि पूजा जोशी या अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या. आता स्मॉल स्क्रिनवरचा एक प्रसिद्ध अभिनेतासुद्धा विवाहबद्ध झाला आहे. आम्ही बोलतोय ते 'निली छतरी वाले' या मालिकेत शिवाय ही भूमिका वठवणारा अभिनेता हिमांशू सोनीविषयी. हिमांशी त्याची गर्लफ्रेंड शीतल सिंगसोबत जयपूरमध्ये शाही थाटात विवाहबद्ध झाला.
या दोघांची भेट 'बुद्धा' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत हिमांशू मेन लीडमध्ये होता. तर शीतल या मालिकेची सहनिर्माती होती. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान हिमांशूने शीतलला लग्नाची मागणी घातली होती. मात्र शीतलने तेव्हा होकार न देता मालिका ऑफ एअर झाल्यानंतर आपला होकार दिला.
या दोघांच्या लग्नात स्मॉल इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर हिमांशू आणि शीतलचा हनीमूनला जायचा प्लान नाहीये. याचे कारण म्हणजे सध्या हिमांशू कामात खूप बिझी आहे. त्यामुळे त्याने हनीमून पुढे ढकलला आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला हिमांशू आणि शीतलच्या लग्नसोहळ्याची खास क्षणचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, कसा शाही थाटात संपन्न झाला हा लग्नसोहळा...