आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

THEN AND NOW : पाहा गेल्या 11 वर्षांत किती बदलली \'शक्तिमान\'मधील स्टारकास्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः
तुम्हाला दहा वर्षांपूर्वी दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणारी 'शक्तिमान' ही मालिका नक्कीच आठवत असेल ना... 'शक्तिमान' हा पहिला सुपरहीरो होता जो शत्रुंचा नाश करताना लहान मुलांना एक नवीन संदेश देत होता. याच कारणामुळे 'शक्तिमान' लहान मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही विशेष लोकप्रिय झाला होता. 13 सप्टेंबर 1997 रोजी शक्तिमान या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता.
तब्बल आठ वर्षे ही मालिका यशस्वीरित्या छोट्या पडद्यावर सुरु होती. 'शक्तिमान' ही "सुपरहीरो" मालिका दूरदर्शन वरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने 400 पेक्षा जास्त भाग पूर्ण केले. त्यानंतर 'आर्यमान', 'जूनियर जी' इत्यादी मालिका आल्या, पण त्यांना हे यशाचे शिखर गाठता आले नाही. 27 मार्च 2005 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
आज दहा वर्षांहून अधिकचा काळ लोटला असला तरी प्रेक्षकांमध्ये शक्तिमान, गीता, शलाका, किलविश या पात्रांचा विसर नक्कीच प्रेक्षकांना पडलेला नाही.
या रिपोर्टच्या माध्यमातून या मालिकेच्या आठवणींना उजाळा देत आम्ही तुम्हाला यातील स्टारकास्ट आज कशी दिसते आणि ती सध्या काय करतेय याविषयीची माहिती देतोय...

खरे नाव - मुकेश खन्ना
पात्राचे नाव - गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री उर्फ शक्तिमान

गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री उर्फ शक्तिमानची भूमिका वठवणारे अभिनेते मुकेश खन्ना आता ५८ वर्षांचे झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच छोट्या पडद्यावर ऑफ एअर झालेल्या 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेत ते झळकले होते. मुकेश खन्ना केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरीलदेखील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'शक्तिमान' मालिकेतील स्टारकास्टचा पूर्वी आणि आताचा लूक सोबतच जाणून घ्या आता ते काय करत आहेत...