आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then & Now: लूक बदलून येतोय \'शक्‍तिमान\', बघा गेल्या 11 वर्षांत किती बदलली स्टारकास्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश खन्ना - Divya Marathi
मुकेश खन्ना
एन्टरटेन्मेंट डेस्कः तुम्हाला दहा वर्षांपूर्वी दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणारी 'शक्तिमान' ही मालिका नक्कीच आठवत असेल ना... 'शक्तिमान' हा पहिला सुपरहीरो होता जो शत्रुंचा नाश करताना लहान मुलांना एक नवीन संदेश देत होता. याच कारणामुळे 'शक्तिमान' लहान मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही विशेष लोकप्रिय झाला होता. 13 सप्टेंबर 1997 रोजी 'शक्तिमान' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तब्बल आठ वर्षे ही मालिका यशस्वीरित्या छोट्या पडद्यावर सुरु होती. 'शक्तिमान' ही "सुपरहीरो" मालिका दूरदर्शन वरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने 400 पेक्षा जास्त भाग पूर्ण केले. त्यानंतर 'आर्यमान', 'जूनियर जी' इत्यादी मालिका आल्या, पण त्यांना हे यशाचे शिखर गाठता आले नाही. 27 मार्च 2005 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
'शक्तिमान' छोट्या पडद्यावर परततोय...
आज दहा वर्षांहून अधिकचा काळ लोटला असला तरी प्रेक्षकांमध्ये शक्तिमान, गीता, शलाका, किलविश या पात्रांचा विसर नक्कीच प्रेक्षकांना पडलेला नाही. म्हणूनच तब्बल दशकभरानंतर भारतातील पहिला सुपरहीरो ठरलेला 'शक्तिमान' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. स्वतः मुकेश खन्ना याविषयीची माहिती दिली आहे. नव्वदच्या दशकात बच्चे कंपनीला वेड लावणारी ‘शक्तिमान’ ही मालिका नव्या दमाने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. माझ्या हृदयाशी जुळलेला विषय असल्याने मी मागच्या तीन वर्षांपासून शक्तिमानला पुन्हा पडद्यावर आणण्यासाठी मेहनत घेतोय. सर्व तयारी जवळपास झाली असून लवकरच तो प्रसारित होईल, असे मुकेश खन्ना यांनी divyamarathi.com ला सांगितले.
गंगाधर, शक्तिमान, गीता विश्वास, किलविश सर्व काही तेच असणार आहेत. तंत्रज्ञान इफेक्टमध्ये बराच बदल असेल. पूर्वी मुलांच्या सवयी जीवनशैलीशी निगडित होत्या. त्यांना द्यावा लागणारा संदेशही सवयींबाबतच होता. मात्र, आता तंत्रज्ञान, इंटरनेटमुळे मुलांच्या सवयी वेगळ्याच बनल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला संदेशही बदलावे लागणार आहेत. मी 15 किलो वजन घटवले असून वैष्णवी महंतलाही (गीता विश्वास) सौंदर्यावर काम करायला लावले आहे.
शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या निमित्ताने या मालिकेतील स्टारकास्ट आता दहा ते अकरा वर्षांनंतर कशी दिसते, आणि ती सध्या काय करतेय याविषयीची माहिती घेऊन आलो आहोत...

खरे नाव - मुकेश खन्ना
पात्राचे नाव - गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री उर्फ शक्तिमान
गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री उर्फ शक्तिमानची भूमिका वठवणारे अभिनेते मुकेश खन्ना आता ५८ वर्षांचे झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच छोट्या पडद्यावर ऑफ एअर झालेल्या 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेत ते झळकले होते. मुकेश खन्ना केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरीलदेखील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'शक्तिमान' मालिकेतील स्टारकास्टचा पूर्वी आणि आताचा लूक सोबतच जाणून घ्या आता ते काय करत आहेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...