आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हितेन तेजवानीला तिकिट टू बॉलिवूड, अक्षय कुमारबरोबर झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


महिलांची आवडती मालिका ‘पवित्र रिश्ता’मधील नायक हितेन तेजवानीची बॉलिवूडमध्ये वर्णी लागली आहे. तो ‘एन्टरटेन्मेंट’ या सिनेमात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

लेखक साजिद-फरहाद या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमातून ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांनी ‘बोल बच्चन’, ‘हाऊसफुल 2’, ‘रेडी’, ‘गोलमाल रिटर्न’ आणि ‘गोलमाल 3’ या सिनेमांचे संवाद लिहिले आहेत.

हितेन या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ‘सिनेमात माझी खूप छोटी भूमिका आहे. मी छोट्या पडद्याचा नायक आहे. रमेश तौरानी नात्यात असल्यामुळे मी हा सिनेमा करत आहे.’ असे हितेन म्हणाला.

हितेनने आपल्या भूमिकेची शूटिंग केली आहे. सिनेमाचा भाग बनून तो खुश आहे. सध्या हितेन एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये मानव देशमुखची भूमिका करत आहे. याबरोबरच तो गुन्हेगारी जगतावर आधारित ‘सावधान इंडिया’चे संचालनदेखील करत आहे. 'कुटुंब' आणि 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये देखील त्याने काम केले आहे.

छोट्या पडद्यावर आपल्या लोकप्रियतेविषयी हितेन म्हणाला की, ‘मी खूप भाग्यवान आहे की, लोक मला माझ्या मालिकेतील नावाने ओळखतात. या मालिकांमुळे मी यशस्वी होऊ शकलो आणि लोकांच्या मनावर राज्य करू शकलो.’ सिनेमाचा निर्माता रमेश तौरानी यांनी याआधी अक्षय कुमारसोबत ‘हिम्मतवाला’ सिनेमा केलेला आहे.