आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Holi Celebration On The Sets Of Comedy Nights With Kapil

PICS: 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर होळीच्या रंगांची उधळण, टीव्ही स्टार्सनी केली धमाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात काही दिवसांपासून होळीची तयारी केली जात आहे. तसेच टीव्ही शोवरसुध्दा होळीची जोरदार तयारी केली जात आहे. जवळपास सर्वच एंटरटेनमेन्ट चॅनलवर या सणाचा मोठा उत्साह दिसून येणार आहे. कलर्स चॅनलवर प्रसारित होणारा लोकप्रिय 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोच्या सेटवरसुध्दा होळीची धमाल-मस्ती दिसून येणार आहे. या होळीला या शोच्या सेटवरसुध्दा रंगांची उधळण होणार आहे.
नुकताच या शोचा एक खास एपिसोड शुट करण्यात आला आहे. यावेळी या शोमध्ये 'खतरो के खिलाडी'चे सर्व स्पर्धक होळी साजरी करण्यासाठी येणार आहेत. याव्यतिरिक्त टीव्ही आणि सिनेजगातील काही स्टार्ससुध्दा सेटवर दिसणार आहेत.
'देवो के देव महादेव'ची सती अर्थातच मैनी रॉय यावेळी डान्स करताना दिसेल. यांच्याव्यतिरिक्त प्रसिध्द गायक कैलाश खेर, कोरिओग्राफर रेमो डी सूझा आणि टेरेंससुध्दा कपिलच्या कुटुंबीयांसोबत होळी खेळताना दिसणार आहे.
सेटवर पोहोचलेल्या सर्वच स्टार्सनी खूप धमाल-मस्ती केली. आज तुम्हाला दाखवणार आहोत शोच्या सेटवर आलेल्या सर्व स्टार्सची काही खास छायाचित्रे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा स्टार्सचे PICS...