आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यो यो हनीसिंग \'झलक दिखला जा\'मध्ये दाखवणार डान्सचा जलवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी 'झलक दिखला जा' या शोमध्ये आतापर्यंत फक्त टीव्ही स्टार्सच झळकत होते. परंतु आता या शोच्या सातव्या पर्वात रॅप गायक यो यो हनीसिंगसुध्दा सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या शोमध्ये सहभाग घेणारा हनीसिंग हा पहिला गायक नाहीये. यापूर्वीच्या पर्वामध्ये पाश्वगायक शानने शोमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याने त्याच्या डान्सच्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
त्याच्याव्यतिरिक्त तलत अजीज, मिका आणि हार्ड कौरसारखे गायकसुध्दा या शोचे भाग बनले होते. एवढेच नाही तर, इंडिअन आयडल विजेता पाश्वगायक मियांग चँग चौथ्या पर्वाचा विजेतसुध्दा ठरला होता. आता यावर्षीच्या या पर्वात माधुरी दीक्षित नेने, रेमो डीसुझा आणि करण जोहर हे परिक्षकांची भूमिका साकारताना दिसतील.
हनीसिंग या शोमध्ये काम करणार असल्याची बातमी कळल्याने शोचे निर्माते आनंदी दिसत आहेत. कारण शाहरुख, अक्षय आणि आता रणबीरसारख्या हिट स्टार्ससोबत रॅपिंग करणा-या हनीची फॅन फ़ॉलोइंग जास्त आहे. निर्मात्यांना आशा आहे, की हनी या शोसाठी होकार देऊ शकतो. हनी जर या शोमध्ये सहभागी झाला तर त्यांच्या शोचा टीआरपी नक्कीच वाढेल. हनीला डान्स करताना बघणे त्याच्या चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नसणार कारण तो त्याच्या आगामी सिनेमात स्वत:च्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. हनीच्या गाण्यांसोबत लोक त्याच्या कूल मूव्सचेसुध्दा मोठे चाहते आहेत.