हनीसिंगचे वादग्रस्त टि्वट, या टि्वटसह कपिलसह पोस्ट केलेली सेल्फी
मुंबई: विनोदवीर कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' कॉमेडीसाठी ओळखला जातो. परंतु मागील काही दिवसांपूर्वी मनोरंजन आणि विनोदासह संगीताच्या स्वरांनी मंत्रमुग्ध झाले होते. प्रसिध्द रॅपर यो यो हनीसिंग या शोच्या सेटवर पोहोचला होता. यादरम्यान त्याने अनेक सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. कपिल ऑनस्क्रिन कुटुंबीतील सदस्यांसहसुध्दा खूप धमाल करताना दिसतो. विशेष म्हणजे, बुआसह त्याची जुगलबंदी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावते.
अद्याप हा एपिसोड प्रसारित झालेला नाहीये. परंतु हनीसिंगच्या टि्वटर अकाउंटवर शो चित्रीत करण्यात आल्याची पुष्टी देण्यात आली होती. मागील काही दिवसांपूर्वी हनीसिंगने कपिल शर्माविषयी अभद्र भाषा वापरल्याच्या प्रकरणाने चर्चेत आला होता.
त्याने एक टि्वट केले होते, 'कपिल शर्मा केवळ एक विनोदवीर आणि तो एक गायक नाहीये. तो तर #@$ आहे आणि त्याला एंटरटेनर म्हटले जाते.' त्याच्या या टि्वटने कपिलच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली होती. त्याने वाढत्या नाराजीकडे बघून ही पोस्ट डिलीट केली होती. सुत्रांच्या सांगण्याप्रमाणे, हनीसिंगचा हा एपिसोड 6 जुलै रोजी प्रसारित केले जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर हनीसिंगची काही निवडक छायाचित्रे...