आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 8 Gautam Gulati Pics Which He Shared In Social Media

Bigg Bossच्या घरातील 'व्हिलन' गौतम गुलाटी Real lifeमध्ये करतो अशी धमाल, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस'चे आठवे पर्व स्पर्धकांमुळे भलतेच गाजत आहे. करिश्मा तन्ना, पुनीत इस्सर, प्रणीत, प्रीतम, सोनाली, अली, डिआंड्रा, सुशांत, आर्य या स्पर्धकांसह गौतम गुलाटी सध्या बिग बॉसच्या घरात अधिक चर्चेत आहे. या सर्व स्पर्धकांमध्ये गौतम कधी हीरो तर कधी व्हिलनच्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येतोय. आपल्या रागिट स्वभावामुळे तो इतर स्पर्धकांपेक्षा जास्त चर्चेत असतो.
सध्या तो सोनालीसोबत जवळीक साधताना दिसतोय. अलीकडेच सोनालीसोबत गौतमने एकच बेड शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली होती. असो, बिग बॉसच्या घरात लागणारा सर्व ड्रामा गौतम योग्यप्रकारे साकारतोय असे म्हणायला हरकत नाही.
मुळचा दिल्लीचा असलेला गौतम सोशल नेटवर्किंग साइटवर बराच अॅक्टिव आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांतून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो. त्याने आपली बरीच छायाचित्रे या माध्यमांमध्ये अपलोड केली आहेत.
एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणारा गौतम 'दीया और बाती हम' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचला. आता 'बिग बॉस'मुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गौतमची खासगी आयुष्याची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा गौतमचा खासगी आयुष्यातील अंदाज...