आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • House Warming Party For Surbhi Jyoti On Her Birthday!

या टीव्ही अभिनेत्रीने दिली बर्थडे पार्टी, फक्त निवडक मित्रांनाच केले आमंत्रित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झी टीव्ही वाहिनीवरील 'कुबूल है' या लोकप्रिय मालिकेत मेन लीडमध्ये झळकणा-या अभिनेत्री सुरभी ज्योती हिने गुरुवारी आपला 26वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने आपल्या राहत्या घरी एक छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रांनाच सुरभीने आमंत्रित केले होते.
सुरभीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किश्वर मार्क मर्चंट, राकेश बापट, आशा नेगी, ऋत्विक धनजानी, रिद्धी डोगरा, वाहबिज दोराबजी, टीजे सिद्धू आणि करणवीर बोहरा हे सेलेब्स पार्टीत सहभागी झाले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही एक खासगी पार्टी होती आणि सुरभीच्या सर्व मित्रांनी पार्टीत भरपूर एन्जॉय केले.
'कुबूल है' या मालिकेत सुरभी सनम हे पात्र साकारत आहे. यापूर्वी मालिकेत ती जोया फारुखीच्या भूमिकेत होती.
सुरभीने आपल्या बर्थडे पार्टीची काही निवडक छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. पुढील स्लाईड्सवर एक नजर टाकुया या छायाचित्रांवर...