आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 17 व्या वर्षी अशी दिसायची विद्या, बघा 'हम पांच'च्या इतर स्टार्सचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्या हिने नुकतीच (1 जानेवारी) वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. विद्याने जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती तेव्हा तिला 'कमनशिबी' स्टार म्हटले गेले होते. त्याचे कारण म्हणजे तब्बल 12 सिनेमांसाठी तिला रिजेक्ट करण्यात आले होते. नंतर मात्र तिला नशीबाची अशी काही साथ मिळाली, की ती आज बॉलिवूडमधील अभिनयसंपन्न अभिनेत्रींपैकी एक आहे. सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. हा विक्रम बी टाऊनमधील अद्याप इतर कोणत्याही अभिनेत्रीने केलेला नाहीये.
 
विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. 40 स्क्रिन टेस्ट, 17 मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता.

छोट्या पडद्यावरुन केली करिअरची सुरुवात
मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी विद्या 'हम पांच' या गाजेलल्या मालिकेत झळकली आहे. त्यावेळी ती केवळ 17 वर्षांची होती.  अभिनेत्री अमिता नांगियाने ही मालिका सोडल्यानंतर राधिकाच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री या मालिकेत झाली. हा विद्याचा संघर्षाचा काळ होता. मात्र या मालिकेने ती प्रसिद्धीझोतात आली.
 
बसला होता 'कमनशिबी' असल्याचा टॅग-
मोहनलालच्या अपोझिट विद्याने 'चक्रम' हा मल्याळम सिनेमा साइन केला होता. यानंतर लगेच तिला 12 सिनेमे मिळाले होते. दुर्भाग्य असे, की हा सिनेमा डिले झाला. यापूर्वी मोहनलाल यांचा कोणताच सिनेमा डिले झाला नव्हता. त्यामुळे निर्मात्यांनी विद्याला 'मनहूस' म्हटले होते. यानंतर तिच्या हातून सर्वचे सर्व 12 सिनेमे गेले. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, विद्याची डेब्यू मालिका असेलली 'हम पांच'ची इतर स्टारकास्ट आता कशी दिसते.  
बातम्या आणखी आहेत...