आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Will Promote To 'bang Bang' In 'bigg Boss'

Bigg Boss 8: सलमानने हृतिकला केले आमंत्रित, पाहा दोघांची बाँडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: हृतिक रोशन आणि सलमान खान)
मुंबई: काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या, की 'बँग बँग'ची टीम कोणत्याच टीव्ही शोमध्ये सिनेमा प्रमोट करणार नाहीये. परंतु आता ऐकिवात येत आहे, की हृतिकने 'बिग बॉस'मध्ये 'बँग बँग'चे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. अलीकडेच, सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये हृतिकने खुलासा केला, की सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो लवकरच 'बिग बॉस'च्या घरात हजेरी लावणार आहे. त्याने सांगितले, 'मला सलमान खानने आपल्या शोमध्ये आमंत्रित केले आहे. आणि मी 2 ऑक्टोबर रोजी शूटींगसाठी जाणार आहे.'
अलीकडेच, एपिसोडमध्ये शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूर यांनीही 'बिग बॉस'मध्ये 'हैदर' सिनेमाचे प्रमोशन केले. तेव्हा सलमानने सांगितले होते, की त्याने हृतिकला बॉडी बिल्डिंग शिकवली आहे. परंतु हृतिकने त्याला अद्याप डान्स शिकवलेला नाहीये.
आता हृतिक एकटाच प्रमोशनसाठी 'बिग बॉस'मध्ये जातो, की सिनेमाची नायिका कतरिना कैफलासोबत घेऊ जातो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. जर कॅट शोमध्ये पोहोचली तर त्यांच्यातील केमिस्ट्री सर्वांनाच पाहायला मिळेल हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिक आणि सलमान यांच्या मधील बाँडिगची छायाचित्रे....