आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Humshakals Cast And Raveena Tandon On Entertainment Ke Liye Kuch Bhi Karega

PICS : 'एन्टरटेन्मेंट के लिए...'मध्ये रवीनाची तलवारबाजी आणि रितेशचे ठुमके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रितेश देशमुख आणि सैफ अली खान स्टारर 'हमशकल्स' हा सिनेमा येत्या 20 जूनला रिलीजसाठी सज्ज झाला आहे. आपल्या सिनेमाला यश मिळावे म्हणून सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचनिमित्ताने या सिनेमाचे दिग्दर्शक साजिद खान, रितेश देशमुख आणि सैफ अली खान अलीकडेच सोनी वाहिनीवरील एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये सर्वांनी खूप धमाल-मस्ती केली. सर्वांनी सेटवर डान्स केला. रितेश आणि शोची जज फराह खान, अनू मलिक यांनी खास फोटोसेशनसुद्धा करुन घेतले.
यावेळी शोचा होस्ट आणि विनोदवीर कृष्णा अभिषेक मिशीत दिसला. याच दिवशी या शोच्या दुस-या एपिसोडचेसुद्धा शुटिंग पार पडले. दुस-या एपिसोडमध्ये फराह खान हजर नव्हती. फराहला तिच्या दुस-या सिनेमाच्या शुटिंगसाठी जायचे होते. त्यामुळे तिच्याऐवजी अभिनेत्री रवीना टंडन हिने परीक्षकाची जबाबदारी सांभाळली. रवीनाने सेटवर कृष्णासह ठुमके लावले. शिवाय तिची तलवारबाजीसुद्धा उपस्थितांना पाहायला मिळाली. रवीनाने सर्व स्पर्धाकांसहसुद्धा ताल धरला. हे दोन्ही एपिसोड्स पुढील महिन्यात सोनी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही एपिसोड्समध्ये शोची परीक्षक फराह खान अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळे तिच्याऐवजी अर्चना पुरणसिंह परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा या दोन्ही एपिसोड्सच्या शूटदरम्यानची धमाल-मस्ती...