आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Not Starting My Own Comedy Show Like Kapil And Sunil: Krushna

गोविंदाच्या भाच्याने केला खुलासा, 'कपिल' आणि 'गुत्थी'सारखा नसेल माझा शो'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स चॅनलवर प्रसारित होणारा कॉमेडी शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पलकची भूमिका साकारणारा कलाकार किक्कू शारदा काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. सोबतच, तो दोन शोमध्ये काम करण्याचा विचार देखील करत आहे. कपिल शर्माचा शोसोबतच तो कॉमेडिअन कृष्णासोबत मॅक्स चॅनलवरील नवीन शोमध्ये काम करणार आहे.
अलीकडेच, अशी बातमी आली होती, की किक्कू 'कॉमेडी नाइट्स...' सोडणार आहे. परंतु त्याला जेव्हा या अफवांविषयी माहिती झाले तेव्हा त्याने माध्यमांसमोर येऊन पुष्टी दिली, की तो कपिलच्या शोचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि शो सोडण्याचा त्याचा अद्याप कोणताही विचार नाहीये.
किक्कू शो सोडणार आणि नवीन शो सुरू करणार आहे या अफवेची जास्त चर्चा झाली नाही. परंतु त्यावेळी कॉमेडिअन कृष्णा नक्कीच काळजीत पडला होता. बातमी अशी आहे, की गोविंदाचा भाचा कृष्णा आणि किक्कू दोघेही मूव्ही चॅनल 'मॅक्स'वर एक शो करणार आहे. 'मॅक्स फुल दीवाना कॉन्टेस्ट' हे त्यांच्या शोचे नाव असणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शोविषयी अधिक माहिती...सोबतच, जाणून घ्या कृष्णाने त्याच्या शोविषयी काय स्पष्टीकरण दिले आणि मॅक्सच्या नवीन कॉमेडी शोचा काय फॉर्मेट आहे...?