आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imam Siddique Divya Marathi Esteemed Celebrity Expert On Big Boss 8

Bigg Boss-8 : इमाम सिद्दिकी divyamarathi.com चे सेलिब्रिटी एक्स्पर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात मोठे एंटरनेटनर असलेले इमाम सिद्दीकी शोच्या सीजन -8 साठी divyamarathi.com चे सेलिब्रिटी एक्स्पर्ट असणार आहे. इमाम या सीजनच्या सुरवातीपासून या शो बद्दल स्वतःचे मत व्यक्त करणार आहेत. 'घरात काय काय सुरु' आहे, यापासून 'कोणता स्पर्धक किती पाण्यात' आहे, यावर आमचे एक्सपर्ट इमाम तुम्हाला गेम समजण्यासाठी मदत करतील.
इमाम एक अॅक्टर, कास्टिंग डायरेक्टर, आर्टिस्ट, फॅशन डिझायनर आणि एंटरटेनर म्हणून परिचीत आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये त्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्याला प्रत्येक 10 तील 8 लोक ओळखतात, मात्र त्याच्या खासगी आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहित नाही. उदाहरणादाखल सांगायचे झाले, तर त्याच्या गृहराज्यात - राजस्थानमध्ये शूट झालेले 'माँ तुझे सलाम' या गाण्याच्या शुटींगमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. हे गाणे प्रसिद्ध संगितकार ए.आर. रहिमान यांनी कंपोज केले होते आणि त्यांनीच गायले होते. या गाण्यासाठी इमामने क्रिएटीव्ह कन्सल्टंट आणि कास्टिंग डायरेक्टरचे काम केले होते.
बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या स्पर्धकांची पार्श्वभूमी काही कारणांमुळे दाखवली जात नाही. त्याचमुळे 26/11 शी संबंधीत इमाम सिद्दिकीच्या अतुलनिय कामगिरीची कथा या शो दरम्यान दाखवली गेली नाही. 26/11 ला जेव्हा मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि स्फोटक घटना घत होत्या तेव्हा सर्वजण आपापल्या घरांमध्ये बसून टीव्हीवर हे दृष्य पाहात होते. त्यावेळी ताज हॉटेल पासून काही अंतरावरच राहात असलेल्या इमामने बाहदूरी दाखवत ताज मध्ये अडकलेल्या परदेशी पाहुण्यांना तिथून बाहेर काढले आणि सुरक्षीत स्थळी हलविले. त्याने एका अ‍ॅम्बुलन्सच्या मदतीने विल्यम पाइक, केली डोएन आणि लेटिटिया या फ्रेंच टीनेजरला सुरक्षीत बाहेर काढले होते.
मुंबईतील डॉन बॉस्को हायस्कूलचा इमाम विद्यार्थी आहे. त्याने फार लहान वयात काव्य लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. व्ही. शांताराम यांनी देखील त्याला सन्मानित केले होते. कास्टिंग डायरेक्टर असताना त्याने इंडस्ट्रीला अनेक नवे चेहरे दिले आहेत. Ammiratis Puris Lintas या जाहिरात कंपनीमध्ये तो कास्टिंग डायरेक्टर असताना त्याने विद्या बालनला तिची पहिली जाहिरात दिली होती. लिरिलच्या जाहिरातीसाठी प्रिती झिंटाला त्यानेच कास्ट केले होते. त्याच्या डिस्कव्हरीची यादी फार मोठी आहे. अमिषा पटेल, सोनाली कुलकर्णी, ल्यूक केनी, रुबी भाटिया, रागेश्वरी लुम्बा, ऋषिता भट्ट आणि मल्लिका शेरावत या सारखे अनेक सेलेब्सचा शोध त्याने घेतला आहे.
एक फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट म्हणून त्याने माजी मिस वर्ल्ड एश्वर्या रॉय, प्रियंका चोपडा, माजी मिस युनिवर्स सुष्मिता सेनसाठी काम केले आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर तयार करण्यात आलेल्या एका शॉर्ट फिल्मसाठी त्याने या अभिनेत्रींसाठी डिझायनर आणि स्टाइल तयार केले होते. एवढेच नाही तर, जगातील प्रसिद्ध रॉक बँड रोलिंग स्टोन्सच्या भारत दौर्‍यात इमाम हा त्या पाच भारतीयांपैकी एक होता जे त्या दौर्‍यात त्यांच्यासोबत होते. इमामने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. आता तो 'बिग बॉस'च्या घरात काय शिजत य हे तुम्हाला सांगणार आहे.