आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imam Siddique\'s Analysis On The Opening Episode Of Big Boss 8

Bigg Boss-8 : वाचा, लाँचिंगवर काय म्हणाले माजी स्पर्धक इमाम सिद्दीकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः इमाम सिद्दीकी आणि सलमान खान)
मुंबईः 'बिग बॉस' हा बहुचर्चित रिअॅलिटी शो 21 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. सलमान खानने आपल्या खास अंदाजात या शोचे ओपनिंग केले. यंदा या शोमध्ये एकुण 12 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 'बिग बॉस 6'चे स्पर्धक इमाम सिद्दीकी divyamarathi.com साठी 'बिग बॉस 8'चे विश्लेषण करणार आहेत. जाणून घेऊया ओपनिंग एपिसोडविषयी इमामचे काय मत आहे...
"सर्वप्रथम मी शोचे होस्ट अब्दुल राशिद सलीम सलमान खान (सलमान खान), कास्टिंग डायरेक्टर आनंद चौहान, एंडेमोल इंडिया, कलर्स टीव्ही आणि स्पेशली माझे सर्व युनिव्हर्सल बहीण-भाऊ यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, की त्यांनी मला 'बिग बॉस 6'मध्ये संधी दिली. 21 सप्टेंबर रोजी 'बिग बॉस 8' हा भारतातील एक मोठा आणि सर्वात लोकप्रिय शो लाँच करण्यात आला. सर्व वाद आणि तर्कवितर्कांनंतर अब्दुल राशिद सलीम सलमान खान पाचव्यांदा हा शो होस्ट करत आहे."
"यंदाच्या पर्वातील पहिली स्पर्धक सोनाली राउत एक मॉडेल आहे. 2014 मध्ये द एक्सपोज या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल. तिच्या मते, ती भांडणांवर नव्हे तर प्रेमावर विश्वास आहे. शोची दुसरी स्पर्धक करिश्मा तन्ना. टीव्ही इंडस्ट्रीतील ती प्रसिद्ध चेहरा आहे. तिने काही निवडक सिनेमांमध्येसुद्धा काम केले आहे. आता ती बिग बॉसमध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे."
"उपेन पटेल शोचा तिसरा स्पर्धक आहे. तो एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेता आहे. त्याच्याविषयी कमी बोलणेच योग्य. चौथी स्पर्धक आहे सोनी सिंग. सोनी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून निगेटीव्ही भूमिकांसाठी तिला ओळखले जाते. राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर या शोमधील पाचवा स्पर्धक आहे."
पुढील स्लाईड्समध्ये वाचा इमामच्या विश्लेषणाचा उर्वरित भाग...