आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IN PHOTOS: Meet TV Stars Reel And Real Life Partners

IN PHOTOS: टीव्ही स्टार्सचे रिअल आणि रील लाइफ पार्टनर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[नीलम सिंह, रोनित रॉय, पल्लवी कुलकर्णी]
मुंबईः टीव्ही अभिनेता रोनित रॉय सध्या 'इतना करो न मुझे प्यार' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी कुलकर्णी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून पल्लवी आणि रोनित यांची केमिस्ट्रीसुद्धा त्यांना भावली आहे.
रोनित रॉयची केमिस्ट्री त्याची रिअल लाइफ पत्नी नीलम सिंहसोबतदेखील खूप चांगली आहे. हे दोघे नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसतात. रोनित आणि नीलम यांचे लग्न 2003 मध्ये झाले होते. या दाम्पत्याला दोन मुले असून अगस्त्य आणि आदर रॉय ही त्यांची नावे आहेत. नीलम रोहितची दुसरी पत्नी आहे. रोनितला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी असून तिचे नाव ओना आहे.
तसे पाहता आपण नेहमी टीव्ही स्टार्सची केमिस्ट्री त्यांच्या पडद्यावरील जोडीदारासोबत बघत असतो. कारण हे स्टार्स आपल्या रिअल लाइफ पार्टनरसोबत फारच क्वचित लाइमलाइटमध्ये येत असतात.
divyamarathi.com तुम्हाला टीव्ही स्टार्सची रिअ आणि रिअल लाइफ पार्टनर्सची छायाचित्रे दाखवत आहे. पुढील स्लाईड्समध्ये भेटा टीव्ही स्टार्सच्या रिल आणि रिअल जोडीदारांना...