आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics: Akshay Kumar, Shilpa Shetty And Ajay Devgn On Nach Baliye 5

PHOTOS : \'नच बलिये 5\'च्या सेटवर \'हिम्मतवाला\' आणि \'स्पेशल 26\'ची टीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नच बलिये 5'च्या .या विकेन्डला दोन मोठे स्टार सेटवर आपल्या सिनेमांचे प्रमोशन करताना दिसतील. आम्ही बोलतोय ते 'स्पेशल 26' आणि 'हिम्मतवाला' या सिनेमांबद्दल. अक्षय कुमार आणि अजय देवगण आपल्या सिनेमांच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'नच बलिये'च्या सेटवर हजेरी लावणार आहेत. आता दोन स्टार्स सेटवर येणार म्हटल्यावर मजामस्ती होणार नाही, असे बरं कसे होईल.

अक्षय कुमार अभिनेत्री काजल अग्रवालबरोबर 'नच बलिये'त येणार आहे. शिवाय हे दोघेही आपल्या सिनेमातील गाण्यावर तालसुद्धा धरणार आहे. इतकेच नाही तर अक्षय म्हणे शिल्पा शेट्टीबरोबरसुद्धा या शोमध्ये परफॉर्म करणार आहे. अक्षय आणि शिल्पाला प्रदीर्घ काळानंतर एकत्र परफॉर्म करताना बघणे त्यांच्या फॅन्ससाठी नक्कीच ट्रीट असणारेय.

शिवाय भाभो (नीलू वाघेला) ला अक्षय कुमार मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंगसुद्धा देणार आहे. अक्षय नीलूला टाईल्स तोडणे शिकवताना दिसेल.

तर दुसरीकडे अजय या शोच्या वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे. शिवाय अजयच्या 'हिम्मतवाला' सिनेमातील प्रसिद्ध 'था थैय्या था थैय्या...' या गाण्याचा वर्ल्ड प्रीमिअर यावेळी करण्यात येणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'नच बलिये 5'च्या या विकेन्डची ही खास छायाचित्रे...