स्टार प्लस वाहिनीवरील 'दीया और बाती हम' या लोकप्रिय मालिकेतील संध्या अर्थातच अभिनेत्री दीपिका सिंह 2 मे रोजी या मालिकेचे दिग्दर्शक रोहित राज गोयलसह लग्नबंधनात अडकली. या लग्नात टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. घोडीवर स्वार झालेल्या नवरदेव रोहितच्या वरातीत अनेक सेलिब्रिटींनी ठुमके लावले.
लग्नापूर्वी 30 एप्रिल रोजी मुंबईत संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या सेरेमनीमध्ये दीया और बाती हम मालिकेतील जवळपास सर्वच कलाकार सहभागी झाले होते. दीपिका आणि रोहितला शुभेच्छा देण्यासाठी नीलू बाघेला (भाभो), कनिका माहेश्वरी (मीनाक्षी), अरुण लोखंडे, नील भट्टसह बरेच सेलेब्स संगीत सेरेमनीमध्ये पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीपिका-रोहितच्या लग्नाची खास छायाचित्रे...