दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगांची उधळण करणा-या होळीच्या सणाची धूम पाहायला मिळणार आहे. रिअल लाइफप्रमाणेच रिल लाइफमध्येसुद्धा रंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर अलीकडेच होळीचा खास एपिसोड शूट करण्यात आला. गोकुळधाम सोसायटीतील सर्व सदस्य उत्साहात होळी खेळताना दिसले.
यावेळी दया जेठालाल गडा (दिशा वकानी), टप्पू (भव्य गांधी), जेठालाल (दिलीप जोशी), चंपक लाल गडा (अमित भट्ट), तारक मेहता (शैलेष लोढा), अंजली (नेहा मेहता), कृष्णन सुब्रह्मण्यम अय्यर (तनुज महाशब्दे), बबिता (मुनमुन दत्ता), आत्माराम भिडे (मंदर चंदावरकर), माधवी (सोनालिका जोशी), सोनू (झील मेहता), रोशन सिंह सोढी (लाड सिंह मान), रोशन कौर (दिलनाज श्रॉफ), गोगी (समय शाह), डॉ. हंसराज हाथी (आजाद कवि), कोमल (अंबिका रंजनकर), गोली (कुश शाह), पत्रकार पोपट लाल (श्याम पाठक) आणि अब्दुल (शरद सांकला) हे सर्व कलाकार या होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. 'तारक मेहता...'च्या सेटवरील कलाकारांची होळी मस्ती बघण्यासारखी होती.
छायाचित्रांमध्ये पाहा कलाकारांचे होळी सेलिब्रेशन...