आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Television Premiere Of Humsafar On Zindagi

आज जिंदगीवर होणार \'हमसफर\'चा इंडियन टेलिव्हिजन प्रीमिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हमसफर' या मालिकेने पाकिस्तानच्या टीव्ही उद्योगाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. आता ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवर 14 ऑक्टोबर 2014पासून रात्री 8 वाजता ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेतून फवाद खान पुनरागमन करत आहे. माहिरा खानची ही पहिलीच मालिका आहे. 'हमसफर' ही पाकिस्तान टीव्हीवरील हाय-रेडेट मालिका असून पाकिस्तानी लेखक फरहत इश्तिआक यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.
'हमसफर'ची कथा अशर आणि खिराद या दोन अतिशय वेगळ्या व्यक्तींवर रेखाटण्यात आली आहे. हे दोघे लग्नानंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या समस्या आणि त्यातून ते एकमेकांच्या प्रेमासाठी कसा मार्ग काढतात हे या मालिकेत मांडण्यात आले आहे.
हमसफरच्या इंडियन टेलिव्हिजन प्रीमिअरबद्दल फवाद खान म्हणाला, 'हमसफर माझ्या हृदयाच्या जवळची आहे. यात पती-पत्नीचे नाते दाखवण्यात आले आहे. जिंदगी गुलजार हैमधील झरुनच्या रुपात प्रेक्षकांचे प्रेम मिळवल्यानंतर हमसफरमधील अशरची भूमिकेतही प्रेक्षकांना आवडेन अशी अपेक्षा बाळगतो.'
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यातील उत्तम केमिस्ट्रीमुळे हमसफरचे कौतुक झाले आहे. याविषयी माहिर खान म्हणते, 'ही माझी पहिलीच मालिका आहे. रात्रीतून प्रसिध्दी मिळावी असे झालेय. माझे आयुष्यच बदलून गेले. खिरादची व्यक्तिरेखा माझ्या जवळची आहे.'