आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Age : \'दयाभाभी\' 38 वर्षांची तर \'जेठालाल\'पेक्षा 6 वर्षांनी लहान आहेत \'बापूजी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दया भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीकडे गोड बातमी असून लवकरच ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या मयूर पंड्यासोबत दिशा विवाहबद्ध झाली होती. आता वयाच्या 38 व्या वर्षी दिशा आई होणार आहे. दिशाजवळ गोड बातमी असल्याने तिचे वडील भीम वाकाणी अतिशय आनंदी आहेत. ते म्हणतात, वयाच्या 38 व्या वर्षी आई होणे इतके सोपे नाही. याकाळात तिला स्वतःची आणि तिच्या होणा-या बाळाची जास्त काळजी घ्यायची गरज आहे. दिशा प्रेग्नेंसीचा काळ पूर्णपणे एन्जॉय करत आहे. घरी तिचे सासू-सासरे काळजी घेत आहेत. तर तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर तिची संपूर्ण टीम तिची काळजी घेत असते. दिशाला आता पाचवा महिना सुरु असून लवकरच ती मॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेकर्स दिशाला मालिकेतून रिप्लेस करण्याच्या मुळीच विचारात नाहीये. कारण ही लीड अॅक्ट्रेस शोचा प्रसिद्ध चेहरा आहे.  
 
'जेठालाल'पेक्षा 6 वर्षांनी लहान आहेत 'बापूजी',
28 जुलै 2008 रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. अगदी पहिल्या एपिसोडपासून दिशा या मालिकेत काम करत आहे. या विनोदी मालिकेविषयीचे बरेचसे अॅक्चुअल फॅक्ट्स लोकांना माहितच नाहीत. उदाहरणार्थ शोमध्ये जेठालाल (दिलीप जोशी)चे वडील चंपकलालची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट खासगी आयुष्यात दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहेत.
 
अनेक पात्रांची झाली अचानक एन्ट्री..
मालिकेत प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भरपूर हसवणारे आहे. मालिकेत जेठालालच्या दुकानात काम करणारे नटु काका अर्थातच घनश्याम नायक यांची बायपास सर्जरी झाली, त्यामुळे त्यांना अचानक मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला होता. निर्मात्यांनी जेठालालच्या दुकानात काम करण्यासाठी तात्पुरती एका पात्राची मालिकेत एन्ट्री केली होती, तो अभिनेता होता तन्मय वेकरिया. पण तन्मयने मालिकेत एवढा चांगला अभिनय केला, की त्याची मालिकेतील जागा कायमस्वरुपी झाली.

या पॅकेजमधून जाणून घ्या, या  गाजलेल्या मालिकेतील स्टार कास्टची Real Age...
 
बातम्या आणखी आहेत...