आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरलेल्या TRP मुळे कपिलला चक्क अर्धी करावी लागली स्वतःची फीस, वाढतच नाहीये शोचे रेटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्माला सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणाचा चांगलाच फटका बसला आहे. 'द कपिल शर्मा शो' या शोमधून सुनील ग्रोव्हरने काढता पाय घेतल्यापासून शोचा टीआरपी सतत घसरत चालला आहे. शोच्या घसरत्या रेटिंगमुळे कपिलला आता त्याच्या माधनधात कपात करावी लागली आहे. आता कपिलने त्याची फीस अर्धी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कपिल आणि वाहिनीने आपापसांत चर्चा करुन फीस अर्धी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पू्र्वी महिन्याला 9 कोटी कमवायचा कपिल...  
बातम्यांनुसार, यापूर्वी कपिलला एका एपिसोडसाठी 60 ते 80 लाखांच्या घरात मानधन मिळायचे.  इतकेच नाही तर सोनी वाहिनीने त्याला वर्षभरासाठी 110 कोटींची ऑफर दिली होती. शोचे मेकर्स कपिलच्या या शोमुळे आनंदी होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. शोचा टीआरपी सतत घसरत चालला आहे. त्यामुळे वाहिनीने कपिलची फीस कमी केली आहे.  

सुधारतच नाहीये कपिलच्या शोचे रेटिंग
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या भांडणानंतर शोमध्ये विद्या बालन, अनुष्का शर्मा, तापसी पन्नू, मनोज बाजपेयी आणि रवीना टंडन हे बॉलिवूड स्टार्स येऊन गेले. पण तरीदेखील शोच्या टीआरपीत वाढ होताना दिसत नाहीये. कपिलने शोचा ट्रॅक पूर्वीप्रमाणे आणण्यासाठी एहसान कुरैशी, राजू श्रीवास्तव, सुनील पॉल यांचीही मदत घेतली. पण तरीदेखील शो प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात अपयशी ठरलाआ हे. 

एकेकाळी कपिलच नव्हे तर या शोमधील इतर कलाकारांनीसुद्धा चांगली कमाई केली होती. किती होता 'द कपिल शर्मा शो'मध्ये झळकलेल्या कलाकारांच्या मानधनाचा आकडा, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...