मुंबई - यमुनानगर, हरियाणाच्या राहणाऱ्या आऱती पंवार यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये 12 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. पण 13व्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने त्यांनी जिंकलेल्या 12.50 लाख रुपयांपैकी 9.30 लाख रुपये गमावले आणि त्यांना फक्त 3.20 लाख मिळाले. चारही लाइफलाइनचा वापर त्यांनी आधीच केला होता. तरीही 13 व्या प्रश्नाचे उत्तर नक्की माहिती नसतानाही त्यांनी अंदाज लावत उत्तर दिले आणि ते उत्तर चुकीचे ठरले.
गृहिणी आहे आरती..
- आरती पंवारने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये सांगितले की, ती एक गृहिणी आहे. पण गेल्या 6 वर्षांपासून त्या एसएससी (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ची तयारी करत आहेत.
- 'केबीसी' मध्ये त्या पती आणि वडिलांबरोबर आल्या होत्या.
- एम.कॉम केलेल्या आरतीची इच्छा आता एमबीए करण्याची आहे.
पुडील स्लाइड्सवर पाहा, आरतीला विचारण्यात आलेले 13 प्रश्न..