Home »TV Guide» Salman Will Apologise To Me Says Zubair Khan Then He Re Enter In Bigg Boss 11

BIGG BOSSच्या घरात परतण्यास तयार आहे झुबेर खान, पण ठेवली 'ही' मोठी अट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 17:52 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात एवढे वाद झाले, की सलमान खानही या वादत अडकला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सलमानने झुबेर खानला त्याच्या वर्तनामुळे चांगलेच सुनावले होते. त्यानंतर झुबेरने आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला होता. तसेच त्याने सलमानच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. पण एवढ्यावरच हा विषय थांबला नाही.
दररोज झुबेर सलमानच्या विरोधात धक्कादायक विधाने करताना दिसतोय. आता त्याने सांगितल्यानुसार, बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्याला शोमध्ये परत बोलावले आहे. पण त्यासाठी वाहिनीला त्याची त्याची एक अट मान्य करावी लागणार आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत, तो पुन्हा एकदा बिग बॉस, सलमान आणि शोमधील स्पर्धकांविरोधात वक्तव्ये केली आहेत.

ही आहे झुबेरची अट...
झुबेरने वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कलर्स वाहिनीने त्याला पुन्हा एकदा शोमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे. तो पुढे म्हणाला, "कलर्सच्या या ऑफरवर मी त्यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. ती अट मान्य झाल्यास मी शोमध्ये पुन्हा सहभागी होईल. सलमानने स्वतः माझी माफी मागावी आणि माझ्यासोबत जे केले ते चुकीचे होते, हे त्याने जगासमोर मान्य करावे."

चांगले परफॉर्म करताना असताना कमी वोट मिळालेच कसे...
झुबेर पुढे म्हणाला, जेव्हा मी लोणावळ्याहून मुंबईला परतलो, तेव्हा मी शोमध्ये चांगले परफॉर्म करत असल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया मला मिळाल्या. इतकेच नाही तर शोच्या पॅनलिस्टच्या मतेही मी शो चांगला खेळत होतो. जर मला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तर मग मी मला कमी वोट मिळालेच कसे? असा प्रश्नसुद्धा त्याने उपस्थित केला आहे.

वाहिनीने केली माझी प्रतिमा मलिन..
झुबेरने मुलाखतीत कलर्स वाहिनीच्या कंटेंटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. झुबेर म्हणाला, की वाहिनीने त्याच्या खासगी आयुष्याचे सत्य न दाखवता टीआरपीसाठी त्याच्याविषयीची चुकीची माहिती प्रसारित केली. उदारहणार्थ, झुबेरने सांगितले, की त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते, पण आता त्याने हे व्यसन सोडले असून एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःची नवी इमेज तयार केली. पण बिग बॉसने त्याच्या आयुष्याची ही पॉझिटिव्ह साइड कधीच दाखवली नाही.

अर्शी खानच्या विरोधात सलमान का बोलत नाही...
झुबेरने बिग बॉसच्या निर्मात्यांवर आरोप लावले. त्याच्या मते, अर्शी खान घरातील लोकांना त्रास देण्यासाठी कुराणच्या आयतांची मदत घेते. धर्माचा चुकीच्या पद्धतीने वापर करते. चॅनल हे सर्व एडिट करुन दाखवतो. झुबेर म्हणाला -'सलमान अर्शीच्या विरोधात का कधी काही बोलत नाही? का तिच्या गैरवर्तनावर पडदा टाकला जातो, कारण तिच्यामुळे TRP मिळतोय आणि तिचा अंडरवर्ल्डशी संबंध नाही"

सलमाननंतर आता कलर्स वाहिनीवर करणार केस
रिअॅलिटी शोमध्ये प्रतिमा मलिन केल्यामुळे तो सलमान नंतर आता कलर्स वाहिनीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे झुबेर म्हणाला आहे.
सलमानला सुनावले होते खडे बोल...
गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर झुबेर आणि त्याच्या कुटुंबीयांनी सलमानला खरी खोटी सुनावली आहे. झुबेरने तर सलमानला धमकीच दिली. तू मला कुत्रा बनवणार ना मग कुठे भेटू सांग, फक्त बॉडीगार्डशिवाय समोर ये, अशा शब्दांत झुबेर सलमानवर घसरला होता.

पुढील स्लाईड्सवर वाचा, सलमानच्या विरोधात काय-काय म्हणाला होता झुबेर...

Next Article

Recommended