आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

58 वर्षांच्या 'शक्तिमान'पासून ते 34 वर्षीय 'महादेव'पर्यंत, या सेलिब्रिटींनी अद्याप केले नाही लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दूरदर्शनवर प्रसारित होणा-या 'शक्तिमान' या गाजलेल्या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते अॅक्टर मुकेश खन्ना येत्या 23 जून रोजी वयाची 59 वर्षे पूर्ण करणार आहेत. मुकेश यांनी अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे, पण आजही लोक त्यांना शक्तिमान उर्फ गंगाधर राव या भूमिकेसाठीच ओळखतात. बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामहची व्यक्तिरेखा साकारण्यासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातसुद्धा हात आजमावला आहे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास, मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न केलेले नाही. 

छोट्या पडद्यावरचा 'महादेव'सुद्धा अद्याप आहे अविवाहित...
'देवों के देव महादेव' या मालिकेतून लाइमलाइटमध्ये आलेला अभिनेता मोहित रैनासुद्धा अद्याप अविवाहित आहे. मोहित 34 वर्षांचा असून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण अद्याप दोघांचा लग्नाचा विचार नाही. मोहित आणि मुकेश खन्नाच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतील असे अजून काही अभिनेते आहेत, जे वयाच्या तिशी-बत्तीशीनंतरदेखील अद्याप अनमॅरिड आहेत.
 
हे टीव्ही अॅक्टर्स कोण आहेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...