आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inside Glimpse Of Bigg Boss Ex Contestants And Gautam Enjoyed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Inside Pics : Bigg Bossच्या ग्रॅण्ड फिनालेत करिश्माचा पडलेला चेहरा आणि इतरांची धमालमस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून पुनीत इस्सार, डिआंड्रा, करिश्मा तन्ना)
मुंबईः 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. शनिवारी (31 जानेवारी) या पर्वाची अंतिम फेरी रंगली. 'दीया और बाती हम' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता गौतम गुलाटी या पर्वाचा विजेता ठरला. करिश्मा तन्ना, गौतम गुलाटी आणि प्रीतम प्यारे यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र प्रीतमने 25 लाख रुपये घेऊन शेवटच्या टप्प्यात हा शो सोडला. त्यामुळे करिश्मा आणि गौतम यांच्यात अंतिम चुरस रंगली आणि गौतमने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या ग्रॅण्ड सोहळ्याला मलायका अरोरा खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सेसनी चारचाँद लावले. बिग बॉसच्या आठव्या पर्वातील माजी स्पर्धकांनी हजेरी लावली होती. प्रणित, डिंपी, राहुल महाजन, पुनीत इस्सार, , उपेन पटेल, डिआंड्रा सॉरेस, संभावना सेठ, सोनाली राऊत, सना खानसह अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. ग्रॅण्ड फिनालेपूर्वी आणि नंतर सर्व स्पर्धकांनी भरपूर धमाल केली. तर विजेतेपद न मिळाल्यामुळे करिश्मा उदास दिसली.
या सोहळ्यातील आतील नजारा तुम्हाला या पॅकेजमध्ये बघायला मिळणार आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्पर्धकांनी केलेली धमाल...