गिफ्टमध्ये मिळालेली ऑडी A3 कार, इन्सेटमध्ये दिशा वाकाणी
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम 'दया भाभी' अर्थातच दिशा वाकाणी आज लग्नगाठीत अडकली आहे. यादरम्यान divyamarathi.comने वेडिंग लोकेशनचे काही फोटो कॅमे-यात क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये लोकेशनच्या सजावटीसह एक ऑडी कारसुध्दा दिसत आहे. ही कार फुलांनी सजलेली आहे.
ही तिच ऑडी A3 कार आहे, जी दिशाला तिचा पती मयूरने गिफ्ट दिली आहे. या कारची किंमत भारतात 28 लाख रुपये आहे. दिशा मुंबई बेस्ड गुजराती बिझनेसमनसोबत लग्न केले आहे. हा लग्न सोहळा खूपच खासगी होता. त्यामध्ये दिशा आणि मयूरच्या कुटुंबाशिवाय निवडक मित्र-मैत्रिणी सामील झाले होते. सूत्रांचे म्हणणे आहे, की दिशा 26 नोव्हेंबरला रिसेप्शन देण्याचे प्लानिंग करत आहे. त्यामध्ये टीव्ही आणि बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सामील होतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वेडिंग लोकेशनचे काही फोटो...
फोटो- अजीत रेडेकर