(अभिनेता करण पटेल आणि अंकिता भार्गव यांच्या संगीत सेरेमनीत पोहोचलेले कलाकार)
मुंबई- 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतील लीड अॅक्टर करण पटेल 3 मे रोजी अभिनेत्री अंकिता भार्गवसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. अंकिता आणि करण यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दोघांच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करण-अंकिताने मित्र आणि कुटुंबीयांसोबत धमाल डान्स परफॉर्मन्स दिले.
या कार्यक्रमात छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. करण पटेलची ऑनस्क्रिन मुलगी रुहानिका धवन यावेळी हजर होती. याशिवाय दिव्यांका त्रिपाठी, अभिनेते जितेंद्र आणि त्यांच्या पत्नी शोभा कपूर, करण ट्रॅकर, क्रिस्टल डिसुजा, पूनम ढिल्लन, राकेश रोशन आणि त्यांच्या पत्नी पिंकी रोशन यांनी संगीत सेरेमनीत
आपली उपस्थिती लावली होती.
अंकिता भार्गवने संगीत सेरेमनीत ऑरेंज आणि ग्रीन कलरचा लहेंगा परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. आपल्या आउटफिट आणि संगीत सेरेमनीविषयी अंकिता म्हणाली, "मला तयार व्हायला एक तास लागला. हा ड्रेस माझ्या सासूबाईंची पसंती आहे. मलासुद्धा हा लहेंगा खूप आवडता."
तर करण पटेल या स्पेशल दिवशी ब्लू शेरवानीत दिसला. divyamarathi.com सोबत बोलताना करण म्हणाला, "हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. खरं सांगू, या कार्यक्रमासाठी मी काहीच तयारी केलेली नाही. मात्र आपल्या डान्स परफॉर्मन्साठी मी खूप उत्साहित आहे. स्मॉल स्क्रिनवर माझे दोनदा लग्न झाले आहे. मात्र ख-या आयुष्यात लग्न करण्यासाठी मी कॉन्फिडंट आहे. (हसताना)"
करण सध्या स्टार प्लस वाहिनीवरील 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत झळकत आहे. तर अंकिताने 'एक नई पहचान', 'सजदा तेरे प्यार में', 'देखा एक ख्वाब' या मालिकांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करण पटेल आणि अंकिता भार्गवच्या संगीत सेरेमनीची खास छायाचित्रे...