आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता..'चे 'नट्टुकाका' ३ रुपयांसाठी करायचे २४ तास काम, पाहा त्यांच्या घराचे Inside Photos...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील नट्टुकाका आपल्या सर्वांनाच माहित आहेत. 'जेठालाल' म्हणजेच दिलीप जोशी यांच्या दुकानातील नोकराच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध आहेत. जवळपास ५५ वर्षापासून 'नट्टुकाका' म्हणजेच घनश्याम नायक गेल्या ५५ वर्षापासून चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. यादरम्यान त्यांनी जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत. 
 
जवळपास २०० गुजराती चित्रपटात आणि हिंदी चित्रपटांसोबत ३५० हिंदी मालिकांत त्यांनी काम केले आहे. घनश्याम नायक यांच्यावर एक वेळ अशी होती की ते पैसे कमवण्यासाठी रस्त्यावर शो करत असत. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी त्यांच्या इंडस्ट्रीतला स्ट्रगलबद्दल  खास बातचीत केली..
 
केवळ ३ रुपयांसाठी २४ तास काम करावे लागल्याचे त्यांनी सांगितले..
 
नायक यांनी सांगितले, की त्यांच्यावर अशीही वेळ आली होती की केवळ ३ रुपयांसाठी ते २४ तास काम करत असत. 

- १० ते १५ वर्षापूर्वी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांना जास्त पैसा मिळत नव्हता. अनेकदा तर पैशाशिवायच काम करावे लागायचे. तेव्हा शेजारच्यांकडून पैसे उधार घेऊन ते घराचे भाडे 
आणि मुलांच्या शाळेची फी देत असत. 

- मी माझे पूर्ण जीवन स्ट्रगल केला आहे पण 'तारक मेहता का उल्टा चश्मा' केल्यानंतर पैसे कमवण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळेच मुंबईत दोन घर घेऊ शकलो, असे त्यांनी 
सांगितले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मुलांना स्ट्रगल करताना पाहायची इच्छा नाही...
 
 
बातम्या आणखी आहेत...