आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शनमध्ये भारतीने घातला होता डायमंड सेट, तुम्ही पाहिलेत का पार्टीचे 13 Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरजे मलिष्का आणि एका फ्रेंडसोबत भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया - Divya Marathi
आरजे मलिष्का आणि एका फ्रेंडसोबत भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया

मुंबईः कॉमेडियन भारती सिंह 3 डिसेंबर रोजी क्रिएटिव्ह रायटर हर्ष लिम्बाचियासोबत विवाहबद्ध झाली. गोव्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर गोव्यातील मर्कुइश बीच रिसॉर्ट येथे वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शनचे काही फोटोज समोर आले आहेत. भारतीने फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला डार्क ब्लू कलरचा गाऊन परिधान केला होता. त्यासोबत तिने डायमंड ज्वेलरी घातली होती. तर हर्ष ब्लॅक सूट आणि व्हाइट शर्टमध्ये दिसला.

 

रिसेप्शनमध्ये दिसले हे सेलिब्रिटी.. 
- रिसेप्शन सेरेमनीत गुरमीत चौधरी पत्नी देबिना बॅनर्जीसोबत सहभागी झाला होता. तर जय भानूशालीसुद्धा पत्नी माही विजसोबत पोहोचला. अभिनेता अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डीसोबत रिसेप्शनमध्ये दिसली.  
- याशिवाय अदा खान, आरजे मलिष्का, किश्वर मर्चंटसह अनेक सेलिब्रिटी हर्ष-भारतीला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते.
- रिसेप्शनपूर्वी मीडियाशी बोलताना भारती म्हणाली  होती, "हा आमच्या लग्नसोहळ्यातील शेवटचा कार्यक्रम आहे. मी खूप जास्त भावूक झाली आहे. आज खूप रडू येतंय."


सेरेमनीत पोहोचले नाही सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा...
- सुनील ग्रोवर 2 डिसेंबर रोजी गोव्यात पोहोचला होता. तो भारती आणि हर्ष यांच्या कॉकटेल पार्टीत दिसला. पण लग्न आणि रिसेप्शनला त्याने दांडी मारली होती.
 - तर रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा 3 डिसेंबर रोजी गोव्यात होता. पण त्याने भारतीच्या लग्न आणि रिसेप्शनला उपस्थिती लावली नाही.


पुढील स्लाईड्सवर बघा, भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या रिसेप्शनचे 12 Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...