आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss 8: विजेता ठरल्यानंतर गौतमने सेटवर थाटात केले होते सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शोचा विजेता ठरल्यानंतर गौतम गुलाटीसोबत सना खान आणि डिंपी महाजन)
मुंबईः शनिवारी लोणावळ्यात 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले रंगला. 'दिया और बाती हम' फेम गौतम गुलाटी या पर्वाचा विजेता ठरला. या ग्रॅण्ड फिनालेत गौतमच्या कुटुंबातून त्याची आई, भाऊ आणि वहिनी सहभागी झाले होते.
शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर गौतमने सर्वप्रथम फराह खान आणि नंतर करिश्मा तन्नाची गळाभेट घेतली. त्यानंतर स्टेजवरुन खाली उतरुन आपल्या आईला अलिंगन दिले आणि तिच्या हस्ते विनिंग ट्रॉफी स्वीकारली. यावेळी गौतमने स्टेजवर ताल धरुन आपला आनंद साजरा केला. यावेळी पुनीत इस्सर, प्रीतम सिंह, अली कुली मिर्झा, सना खान, महक चहल, संभावना सेठ, डिंपी महाजन गौतमच्या आनंदात सहभागी झाले होते. एकंदरीतच सेटवरचे वातावरण खूप आनंदी आणि उत्साही होते.
फराह खानने गौतमच्या नावाची विजेता म्हणून घोषणा करणे आणि गौतमने ट्रॉफी स्वीकारणे... हे क्षण तुम्ही टीव्हीवर पाहिले आहेत. मात्र शो संपल्यानंतरचे असे अनेक क्षण आहेत, जे टीव्हीवर प्रेक्षकांना बघता आले नाहीत. तेच खास क्षण अर्थातच सेटवरील आतील नजारा divyamarathi.com तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून दाखवत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा गौतम विजेता ठरल्यानंतरचे सेटवरील खास क्षण...