आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: 19व्या मजल्यावर आहे Bigg Bossची Ex-स्पर्धक दीपशिखाचा फ्लॅट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या फ्लॅटमध्ये दीपशिखा नागपाल)
मुंबईः अभिनेत्री दीपशिखा नागपाल बिग बॉसच्या या पर्वातील टफ कंटेस्टंट्सपैकी एक होती. मात्र शेवटच्या फेरीत मजल मारण्यात ती अपयशी ठरली. शोमध्ये दमदार खेळ खेळणारी दीपशिखा बिनधास्तपणे आपले खासगी आयुष्य जगते. मुंबईतील एका उपनगरात ती पती केशव अरोरा, नऊ वर्षीय मुलगी वेधिका आणि पाच वर्षीय मुलगा विवानसोबत वास्तव्याला आहे. वास्तुशास्त्रावर तिचा खूप विश्वास आहे. तिने आपल्या घराला वास्तुशास्त्रानुसार तयार केले आहे. तिच्या मते, वास्तुशास्त्रानुसार घराची सजावट करणे फायदेशीर ठरते.
divyamarathi.comसोबत केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतमध्ये दीपशिखाने आपल्या घराविषयी सांगितले. ती म्हणाली, "जेथे खेळती हवा आणि पर्याप्त प्रकाश असेल, अशा घराच्या शोधात मी होते. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही 19 मजल्यावर असलेल्या या फ्लॅटमध्ये
वास्तव्याला आहोत. माझ्या घरावर माझे खूप प्रेम आहे. येथे मला सकारात्मक ऊर्जा मिळते. वास्तुशास्त्रावर दांडगा विश्वास असल्याचे मी प्रामाणिकपणे सांगते. त्यानुसारच मी घराची रचना केली आहे. घरातील कोप-यांमध्ये छोट्या पेटिंग्स या वास्तुनुसारच ठेवल्या आहेत."
आपल्या घराचे इंटेरियर दीपशिखाने स्वतः केले आहे. एखादी कलाकृती आवडल्यास ती नक्की आपल्या घरी आणते. ती म्हणते, "दर दोन वर्षांनी मी घरातील इंटेरियर बदलत असते. घरातील शोभेच्या वस्तू या फुकेट आणि छत्तीसगडहून आणल्या आहेत. मला आर्ट पसंत आहे. आर्ट मला आकर्षित करते. पेटिंग्समध्ये मी नेहमी काहीतरी बदल करत असते. याच कारणामुळे या पेटिंग्स प्रत्येकवेळी नवीन भासतात. मला नाजुक फर्निचर पसंत नाही. कारण ते आरामदायक नसतात."
दीपशिखा लवकरच नवीन घरी शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर तेथील छायाचित्रे आपल्या चाहत्यांसोबत नक्की शेअर करणार असल्याचे दीपशिखाने सांगितले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीपशिखा सध्या वास्तव्याला असलेल्या फ्लॅटची आतील छायाचित्रे... र्व फोटोः अजीत रेडेकर