(डावीकडे - करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल, उजवीकडे - 'नच बलिये 7'चे स्पर्धक वास्तव्याला असलेल्या घराची झलक)
मुंबईः 'नच बलिये 7' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी जोड्या आपल्या परफॉर्मन्सनी परीक्षकांना इम्प्रेस करण्याची एकही संधी दवडत नाहीयेत. अलीकडेच शोचे टॉप कपल्स उपेन पटेल-करिश्मा तन्ना, रश्मी देसाई-नंदीश संधू, हिमांशु मल्होत्रा-अमृता खानविलकर आणि ऐश्वर्या सखूजा-रोहित नाग यांनी मीडियाला त्यांच्या या शोमधील आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले.
Divyamarathi.com शी बोलताना रश्मी देसाई म्हणाली, "आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान झाला. याकाळात मी नंदिशच्या आणखी जवळ आले. कारण याकाळात आम्हाला जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता आला. आमचे नाते मजबूत करण्यासाठी हे महत्त्वाचे क्षण ठरले."
अभिनेता हिमांशू मल्होत्रा म्हणाला, "सर्वच स्पर्धक उत्तम काम करत आहेत. मात्र उपेन-करिश्मा सर्वात स्ट्राँग कंटेस्टंट्स आहेत. ते आमचे मोठे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र आम्ही येथील प्रत्येक क्षण एन्जॉय करतोय. अमृता आणि मी फायनलमध्ये धडक मारु अशी अपेक्षा आहे."
'नच बलिये 7' या शोची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांची आहे. या शोचे शूटिंग बालाजी टेलिफिल्म्सच्या प्रॉडक्शन हाउसमधझ्ये होते. शूटिंगच्या काळात स्पर्धक येथेच वास्तव्याला असतात.
Divyamarathi.com तुम्हाला सेलिब्रिटी कपल्सच्या 'लव्ह नेस्ट'चे इनसाइड फोटोज, दाखवत आहोत. याच ठिकाणी शूटिंगच्या काळात हे सेलिब्रिटी वास्तव्याला असतात.
सर्व फोटोजः अजीत रेडेकर