आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कपिलच्या 'बुआ'ने विकला होता बंगला, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  कपिल शर्माची 'बुआ' या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उपासना सिंह स्ट्रगलिंगच्या काळात दोन बेडरुम आणि किचनच्या घरात राहत असे. पण आता यशस्वी अभिनेत्री आणि कॉमेडीयन म्हणून नाव कमवल्यावर उपासना यांनी मुंबईत आलीशान 4BHK फ्लॅट घेतला आहे. जवळपास 10 वर्षापूर्वी उपासना यांनी आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत हा फ्लॅट घेतला. उपासना यांचा हा फ्लॅट लोखंडवाला (अंधेरी वेस्ट) भागात आहे. घरात एकट्याच राहतात उपासना..
 
- नुकतेच आमच्या प्रतिनीधींशी उपासना यांनी संवाद साधला यावेळी उपासना एकट्याच त्या घरात राहत असल्याचे समजते. 
- संवाद साधताना उपासना यांनी सांगितले की, हे घर खरेदी करण्याअगोदर मी अंधेरीच्या मुख्य भागापासून काही किलोमीटर दूर बंगल्यात राहत असे. आईसोबत जेव्हा मी जॉगर्स पार्कमध्ये यायची तेव्हा आई या बिल्डींगला पाहत राहायची.
- आईला हा एरीया फार आवडायचा. एका दिवसात ती जवळपास 4-5 वेळेस या एरियात येत असे. जेव्हा मला कळाले की आई येथे येत राहते तेव्हा मी ठरवले की काहीही झाले तरी या एरीयात घर घ्यायचे.
 
बंगला विकून घेतला हा फ्लॅट..
 उपासना यांनी सांगितले की, "या अपार्टमेंटची किंमत खूप जास्त होती पण मला आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते त्यामुळे मी बंगला विकून हे अपार्टमेंट खरेदी केले. मी एक्सट्रा कमाई करण्यासही सुरुवात केली होती. जेव्हा मी हे घर खरेदी केले तेव्हा माझ्या आईसाठी तो फार प्राऊड मोमेंट होता. आज ती माझ्यासोबत नाही पण माझे घर पूर्ण तिच्या आठवणींनी भरलेले आहे."
 
होशियारपूरमध्ये होते केवळ दोन रुम्स..
- उपासना सिंह मुळच्या होशियारपुर, पंजाब येथील आहेत. तेथे त्यांचे संपूर्ण कुटुंब केवळ 2 रुममध्ये राहत असे. 
- सध्या उपासना जिथे राहतात तो एरिया निसर्गसानिध्याच्या जवळ आहे आणि शहराच्या दुसऱ्या जागेपेक्षा येथे ट्रॅफिकही कमी आहे. 
- उपासना यांच्या याच फ्लॅटच्यावर त्यांची मोठी बहीणही राहते. 
- उपासना यांनी वास्तुनुसार घराची सजावट केलेली आहे.
- सोफा, वॉल पेंटिंग आणि पडदे उपासना यांनी स्वतःच्या हातांनी सजवले आहे.

पुढच्या स्लाईडवर पाहा, उपासना यांच्या घराचे Inside Photos 
बातम्या आणखी आहेत...