आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाघा-बावरीचा साखरपुडा, स्क्रिप्ट वाचताना दिसली दयाभाभी, चला \'तारक...\'च्या On Locationवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'तारक मेहता का उल्टा चष्मा\'च्या सेटवरील नजारा - Divya Marathi
\'तारक मेहता का उल्टा चष्मा\'च्या सेटवरील नजारा
एन्टरटेन्मेंट डेस्कः अखेर बाघाला त्याचे प्रेम मिळाले आणि बावरीच्या कुटुंबीयांनी त्याचा जावई म्हणून स्वीकार केला. होय, आम्ही बोलतोय ते 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या गाजलेल्या मालिकेतील बाघाविषयी... छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध विनोदी मालिकेत नेहमीच नवीन गमतीजमती बघायला मिळत असतात. शोमधील सर्वच पात्र एकापेक्षा एक आहेत. जेव्हा मालिकेत बाघाची गर्लफ्रेंड बावरीचे पात्र साकारणारी मोनिका सिंह भदौरियाची एन्ट्री होते, तेव्हा प्रेक्षक हसू आवरु शकत नाहीत. आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट आलाय. बाघा आणि बावरीचा अखेर साखरपुडा झाला आहे. या दोघांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने संपूर्ण गोकुलधाम सोसायटीत आनंदाचे वातावरण आहे.

बबिताने पिवळ्या रंगाचा लहेंगा परिधान केला आहे. याविषयी बबिता अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्ता सांगते, "खूप दिवसांनी सोसायटी नटण्याची संधी मिळाली आहे. हा लहेंगा मी स्वतः डिझाइन केला आहे. शोच्या शूटिंगमध्ये लहेंगा परिधान करण्याचा मी निर्णय घेतला. सगळ्यांनाच माझे हे क्रिएशन पसंत पडले."
तर दुसरीकडे अंजली भाभीने गुजराती स्टाइलची साडी परिधान केली. तर दयाभाभीसुद्धा लहेंग्यात दिसली. मिसेस भिडेने केसांत गजरा माळलेला दिसला. बावरी अर्थातच मोनिका म्हणते, "अखेर बागेश्वरजी माझे झाले याचा मला खूप आनंद होतोय. माझे कुटुंबीय या लग्नासाठी तयार झाले."
बावरीसोबत बाघाचे लग्न व्हावे यासाठी जेठालाल नोकर बनले, तर दयाबेन बाघाची बहीण.
याविषयी मालिकेचे निर्माते असद मोदी सांगतात, "ब-याच दिवसांनी आम्ही मालिकेत प्रेमप्रसंग दाखवत आहोत. बाघा आणि बावरीचा साखरपुड्या मोठ्या थाटात करण्याचा आम्ही विचार केला."
बाघा आणि बावरीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच गोकुलधाम सोसायटीत सनईचे सूर ऐकू आले. या लग्नासाठी मात्र बिचा-या जेठालालवर नोकर बनण्याची वेळ आली.या साखरपुड्यामुळे जेठालाल खूप आनंदी आहे. याविषयी जेठालाल अर्थातच दिलीप जोशी म्हणतात, "ही खूप आनंदाची गोष्ट आहे, की साखरपुड्याच्या कार्यक्रम आमच्या सोसायटीत होतोय."

या पॅकेजमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील ऑन लोकेशनवरील छायाचित्रे... बाघा-बावरीच्या साखरपुड्याच्या सिक्वेन्सची झलक तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. ऑन लोकेशनवर फेरफटका मारत असताना, दयाभाभी स्क्रिप्ट वाचताना दिसली, तर डॉ. हाथी आराम करताना...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा कसा आहे सेटवरील नजारा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्याWhatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...