मुंबई- अलीकडेच मुंबईस्थित फिल्मसिटीमध्ये 'इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स' सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर अनेक टीव्ही स्टार्स पोहोचले होते. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री सेक्सी अंदाजात सोहळ्यात अवतरल्या होत्या. ITAच्या रेड कार्पेटवर निया शर्माचा बोल्ड अंदाज बघायला मिळाला. तिने व्हाइट कलरचा ट्रान्सपरंट गाऊन परिधान केला होता. नियासह हिना खान, क्रिस्टल डिसूजा, देवोलिना भट्टाचार्जी, पूजा गौर, मंदिरा बेदी या अभिनेत्रींचाही ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेणारा होता.
यावेळी अनेक टेलिव्हिजन स्टार्सनी दमदार परफॉर्मन्स दिले. मनीष पॉल आणि भारती सिंह या शोचे होस्ट होते. तर गौतम गुलाटी, क्रिस्टल डिसुजा, डेजी शाह, लॉरेन, मोहित मलिक, शमित शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींनी आपल्या परफॉर्मन्सेसनी सोहळ्याला चारचाँद लावले.
या अवॉर्ड्स सोहळ्यातील इनसाइड फोटोज तुम्हाला पुढील स्लाईड्समध्ये बघता येतील...