आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मोकिंगची शौकीन आहे युवराजची वहिनी, Bigg Boss मध्ये एन्ट्रीपूर्वी असे जगायची आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जाणा-या बिग बॉसचे दहावे पर्व सुरु झाले आहे. ८ सेलिब्रिटीज आणि ८ सामान्य लोकांना बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगची वहिनी आकांक्षा शर्मा या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. प्रीमिअर एपिसोडमध्ये आकांक्षा तिच्या सासूबाई शबनम (युवराज सिंगची आई) यांच्याविरोधात नॅशनल टेलिव्हिजनवर वाईट बोलताना दिसली. सासूच्या विचित्र स्वभावाने तिचे लग्न टिकू शकले नसल्याचा आरोप आकांक्षाने केला आहे. आकांक्षा नव-यापासून वेगळी मजामस्तीत आयुष्य व्यतित करत आहे.

कोण आहे आकांक्षा...
गुडगावची रहिवाशी असलेली आकांक्षा शर्मा क्रिकेटर युवराज सिंहची वहिनी आहे. आकांक्षाचे २०१४ मध्ये युवराजचा धाकटा भाऊ जोरावर सिंगसोबत लग्न झाले होते. मात्र चार महिनेसुद्धा हे लग्न टिकू शकले नाही. बिग बॉसच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये आकांक्षा भावूक झालेली दिसली. तिने सांगितले, की लग्नानंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की जगण्यापेक्षा आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात आले होते. लग्नाच्या वेळी आकांक्षा २३ वर्षांची होती. युवराजच्या भावात लाइफ पार्टनर किंवा मित्र मिळू शकला नसल्याचे तिने यावेळी सांगितले. इतकेच नाही तर सासरच्यांकडून पैसा नको तर केवळ या लग्नाच्या बंधनातून स्वतंत्र व्हायचे असल्याचे ती म्हणाली.

२५ वर्षीय आकांक्षा बिनधास्तपणे जगते आयुष्य...
२५ वर्षीय आकांक्षा आता नव-यापासून विभक्त होऊन तिच्या आईवडिलांसोबत राहते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट karmasphere पाहिले असता ती एक्सप्लोरर, रायटर आणि फिटनेस फ्रिक आहे. आकांक्षा पार्टीची शौकीन असल्याचेही तिच्या फोटोजवरुन स्पष्ट होते. तिने स्मोकिंग करतानाचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज पोस्ट केले आहेत. तिच्या मानेवर Karma हा टॅटू आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, आकांक्षा शर्माचे Instagram Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...