आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे रुहीचे घर, उराशी बाळगते अभिनेत्री, गायिका आणि फॅशन डिझाइन होण्याचे स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये अभिनेत्री रुहानिका धवन आई डॉली धवनसोबत)
मुंबई- टीव्ही शो 'ये है मोहब्बते'मधून लोकप्रिय झालेली क्यूट लिटील अभिनेत्री रुहानिका धवनची मोठी फॅन फॉलोइंग आहे. आपल्या क्यूट इनोसेंट स्माइलने या सात वर्षांच्या चिमुकलीने लोकांचे मने जिंकली आहेत. रील लाइफमध्ये तिचे पात्र समजूतदारीची बाजू मांडत असले तरी रिअल लाइफमध्ये ती यापेक्षा एक वेगळी आहे.
अलीकडेच रुहानिका धवनने divyamarathi.comसोबत विशेष बातचीत केली. रुहानिकाने सांगितले, की ती आयपॅडसाठी खूप क्रेझी आहे. यादरम्यान तिने काही सिक्रेट्ससुध्दा शेअर केली.
'रुही'ला नापसंत करते रुहानिका-
'मला 'ये है मोहब्बते'मधील रुही आवडत नाही हे माझ्या अनेक चाहत्यांना ठाऊक नाहीये. कारण हे पात्र एका लिटील क्रँकी बेबीचे आहे. परंतु रिअल लाइफमध्ये मी क्रँकी नाहीये. मला माझ्या बार्बी डॉल आणि खेळण्यांसोबत खेळायला आवडते. सोबतच आपल्या आई-वडील आणि आजी-आजोबावर खूप प्रेम करते. कारण मी त्यांच्याशिवाय अधूरी आहे.'
रुहानिकाला 'रु' म्हणून बोलवतात कुटुंबीय-
रुहानिकाला तिचे कुटुंबीय 'रु' म्हणून बोलावतात. परंतु तिची आई डॉली तिला 'रुहान' नावाने बोलावते. तसेच शोच्या सेटवर सर्व आर्टिस्ट या लिटील एंजेलला खूप प्रेम करतात. अलीकडेच रुहानिका आईसोबत टीव्ही शोच्या सेटवर आली होती. याविषयी तिने सांगितले, 'एप्रिल फुलच्या दिवशी आम्ही प्रॉडक्शन टीमला सांगितले, की आम्ही या शोशी समाधानी नाहीये आणि सर्वजण शो सोडून जात आहोत. हे ऐकून प्रत्येकजण नाराज झाला. जेव्हा बालाजी फिल्म्सचे हेड केतन सरांना जेव्हा याविषयी कळाले तेव्हा ते टीमवर खूप ओरडले. परंतु काही तासातच आम्ही या विनोदावरील पडदा बाजूला केला. हा एक गमतीशीर दिवस होता.'
खेळणी आणि आयपॅडसोबत खेळते रुहानिका-
'जेव्हा मी शूटिंगला जात नाही तेव्हा आयपॅड आणि खेळणीसोबत खेळते. मी रोलर कोस्टरचे व्हिडिओ पाहते.'
रुहानिकाने पुढे सांगितले, 'शाळेत माझे खूप फ्रेंड्स आहेत. ते मला टीव्हीवर पाहून आनंदी होतात.'
मोठी होऊन अभिनेत्री, गायिका आणि फॅशन डिझाइनर होण्याचे स्वप्न-
सात वर्षांच्या रुहानिकाला अभ्यासातील गणित, विज्ञान, कलाकौशल्य हे विषय आवडतात. याविषयी रुही सांगते, 'मला अभिनया करायला आवडतो. परंतु मला अजून खूप शिकायचे आहे. मला गायिका, अभिनेत्री आणि फॅशन डिझाइनर व्हायचे आहे.'
लिटील फॅन्सला रुहानिकाचा संदेश, चांगले व्यक्ती व्हा-
बातचीत करताना रुहानिकाने आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे, 'नेहमी उत्साही राहा आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवा. सर्वात पहिले चांगले व्यक्ती बना.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रुहानिका धवनचे खास फोटो...