आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Krishna Abhishek And Kapil Sharma

एकाच शोमधून लोकप्रिय झाले कृष्णा-कपिल, वाचा दोघांच्या Lifeचे Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा लोकप्रिय शो ऑफएअर झाल्यानंतर याच्या जागी 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' शो सुरु होणार आहे. हा नवीन शो कृष्णा अभिषेक होस्ट करणार आहे. कपिल आणि कृष्णा दोघे लोकांच्या चेह-यावर हसू फुलवण्यात पटाईत आहेत. दोघांनी 'कॉमेडी सर्कस' या शोमधूनच ओळख मिळवली. आज जाणून घेऊया दोघांच्या आयुष्याशी निगडीत Facts...
कृषाला व्हायचे होते गंभीर अभिनेता...
कृष्णाला गंभीर अभिनेता व्हायचे होते. परंतु सतत काम केल्यानंतर आणि पडद्यावर टिकून राहण्याच्या दबावाने त्याला विनोदवीर बनवले. आता तो याच रुपात ओळखला जातो. कृष्णाने 40पेक्षा जास्त हिंदी सोडून इतर सिनेमे केले आहेत. परंतु जेव्हा बॉलिवूडमध्ये त्याला खास काम मिळाले नाही तेव्हा त्याने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला.
तो हावभाव, मिमिक्री आणि पात्रात प्राण ओतून देण्यात पटाईत आहे. तसेच ओघवत बोलण्यात आणि डायलॉग बोलण्यात तो कपिलच्या मागे राहतो. कृष्णाने स्वत:साठी कोणतील स्टाईल सेट केली नाहीये. तो सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे. जेव्हा त्याच्याकडे काम नव्हते तेव्हा तो अभिनयाशी निगडीत छोटे-छोटे काम करत होता. त्याने उडिया, तेलगू, भोजपूर भाषांचे सिनेमे केले. असिस्टंट डायरेक्टर म्हणूनसुध्दा काम केले. आता तो एक लोकप्रिय विनोदवीर झाला आहे.
बालपणी लोकांना हसवण्याचे काम करत होता कपिल...
कपिल बालपणी आपल्या शेजा-यांच्या घरांसमोर काच, कोळसा, मिरची ठेवत होता आणि स्वत: जाऊन त्यांना सांगत होता. लोकांना वाटायचे कुणा तंत्रविद्या केली आहे. परंतु जेव्हा कपिल याचा खुलासा करत होते, तेव्हा सर्व हसत होते. प्रिन्सेस ऑफ माइंड आणि ओघवत बोलण्याचा गुण त्याला गॉड गिफ्ट होते.
तो कॉमेडिअनसोबतच गायकसुध्दा चांगला आहे. त्याने ऑकेस्ट्रामध्येसुध्दा गाणी गायली आहेत. तो इम्प्रोवाइजसाठी प्रसिध्द आहे. त्याच्या बोलण्याची स्टाईल आणि भाषेवरील पकड त्यांला इतर विनोदवीरांमध्ये वेगळे दाखवते. तो जेव्हा बॉलिवूडमध्ये आला होता तेव्हा कुणालाच ओळखत नव्हता. त्याने स्वत:च्या कौशल्याने इतकी ओळख निर्माण केली आहे. कपिलने कृष्णाप्रमाणेच कोणत्याच कामाला लहान समजले नाही. जे आले ते करत गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दोघांच्या आयुष्यातील रंजक गोष्टी...