आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • INTERVIEW: Balika Vadhu Fame Shiv Aka Siddharth Shukla

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बालिका वधू'च्या शिवला मिळाली करण जोहरच्या सिनेमात संधी, वाचा INTERVIEW

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी सिद्धार्थ शुक्ला.)
मुंबई. . 'बालिका वधू' फेम शिव उर्फ टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आता बॉलिवूड स्टार झाल आहे. तो लवकरच दिग्दर्शक शशांक खेतान आणि निर्माता करण जोहरचा सिनेमा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' मध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. त्याची बॉलिवूडमधील सुरूवात आणि आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी dainikbhaskar.com ने त्याच्याशी गप्पा मारल्या. वाचा त्या गप्पांमधला काही अंश:
>> खर्‍या आयुष्यामध्ये जर आलिया भट्टसारखी मुलगी मिळाली, तर तु तिच्याशी लग्न करशील का?
खर्‍या आयुष्यात अजून कोणाशीच लग्न करण्यचा विचार मी केला नाहीये.

>>करण जोहरच्या सिनेमात काम करायची संधी मिळेल हा कधी विचार केला होता का?
कधीच नाही. मी कधीच हा विचार केला नव्हता. मला योग्यवेळी ही योग्य संधी मिळाली. मी जेव्हा 'झलक दिखला जा'त स्पर्धक होतो, तेव्हा करण एका कलाकाराचा शोध घेत होता, जो या रोलमध्ये शोभुन दिसेल. नशीबाने हा रोल मला मिळवून दिला.

>>तु टीव्हीवर आणि मोठ्या पड‍द्यावरदेखील काम केलं आहेस, तुला दोन्हीमध्ये काय फरक जाणवतो?
दोन्हीत तितकंच अंतर आहे जितकं शाही जेवण आणि फास्ट फूडमध्ये असतं.

पुढच्या स्लाइड्सवर वाचा इंटरव्ह्यूचा उर्वरित भाग...

>> तुला आधीपासुनच टीव्हीवर करिअर सुरू करायचं होतं का?
मला नेहमीच मोठ्या पडद्यावर सुरूवात करायची होती. माझ्या असं लक्षात आलं की बॉलीवुड हा मोठा गेम आहे आणि हा एक सीरिअस बिझनेस आहे, ज्यात कोणत्याही तयारीशिवाय एखादा अ‍ॅक्टर येऊ शकत नाही. मला अजून शिकण्याची गरज वाटली. मला वडील नसल्यामुळे माझ्याकडे तीन तासांचा अ‍ॅक्टींग क्लास करायचे पैसेदेखील नव्हते. याचकाळात मला टीव्हीच्या ऑफर् यायला सुरूवात झाली. मी काही पैसे मिळवण्यासाठी त्या स्वीकारायला चालू केलं. शिकण्यासाठी टीव्ही हे खुप चांगलं फिल्ड आहे. मी माझे टीव्हीशी असलेलं नाते कधीच तोडणार नाहीये आणि 'बालिका वधू'देखील सोडणार नाही.

>>तुला सिनेमात इच्छित स्पेस मिळाला आहे असे वाटते का?
सिनेमात माझा रोल स्ट्रॉन्ग आहे , हा एक चांगला ट्विस्ट ठरेल आणि प्रेक्षक मला सिनेमात बघून नक्कीच एंजॉय करतील .

>> तुला कोणत्या नायिकेसोबत काम करायची इच्छा आहे?

मला प्रत्येक नायिकेसोबत काम करायची इच्छा आहे माधुरी दीक्षित नेहमीच आवडती नायिका राहीली आहे. मला 'झलक...' च्या सेटवर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. हे माझ्यासाठी स्वप्नासारखंच होतं .

>>मिडियात अशा बातम्या ऐकू येत आहेत की करणचा सिनेमा मिळाल्यानंतर तुझ्या वागण्यात बदल झाला आहे, तू 'बालिका वधू'च्या के सेटवर नखरे करत आहेस. हे कितपत खरं आहे?

(हसून) मला खुप मजेशआर वाटलं. मी 'बालिका वधू'साठी 12 तास देतो. कमी कलाकार असा वेळ देतात.मी नेहमीच सेटवर हजर असतो आणि त्यांना आवश्यक तेवढा पूर्ण वेळ देतो. लोक फक्त गप्पा मारतात आणि तु्मचा अपमान करण्यासाठी अशा अफवा पसरवतात.

>>तुझ्यावर या अफवांचा काय परिणाम झाला?
अशा गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मला या अफवा बालिश वाटतात आणि मी त्या हसण्यावर उडवून टाकत असतो. या गोष्टी आमच्या कामाचा भाग आहेत. मला खुप विचित्र वाटते जेव्हा लोक असं म्हणतात की माझ्यात अ‍ॅटीट्यूड आला आहे. मला कुठेतरी हेही आवडतं की लोक मला महत्व देतात आणि त्यांना माझ्याबद्दला वाचायला आवडतं.(हसून) मलाही गॉसिप्स वाचायला आवडतं.